Home /News /national /

लग्न करताच पळाला नवरदेव; सासरच्या गावी पोहोचताच दृश्य पाहून हादरली नवरीबाई

लग्न करताच पळाला नवरदेव; सासरच्या गावी पोहोचताच दृश्य पाहून हादरली नवरीबाई

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

प्रेम करून मंदिरात लग्न करताच नवरीला एकटं सोडून नवरदेव आपल्या गावी पळून गेला.

    लखनऊ, 22 जून : दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलं. मंदिरात जाऊन त्यांनी लग्न केलं (Wedding News). लग्नानंतर नवरीबाईला सोडून नवरदेव पळाला. त्याची वाट पाहून पाहून थकलेली नवविवाहिता अखेर नवऱ्याच्या गावी पोहोचली. सासरच्या गावी पोहोचताच तिला जे दृश्य दिसलं ते पाहून धक्काच बसला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. उत्तर प्रदेशमधील लग्नाचं हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. अलापूरच्या ढका गावातील तरुणी नोएडात नोकरी करते. तीन महिन्यांपूर्वी शेजारील म्याऊं गावातील तरुणासोबत तिची मैत्री झाली. पवन असं या तरुणाचं नाव. पवनने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. घरच्यांपासून लपूनछपून दोघं भेटू लागले. त्यानंतर नोएडातच एका मंदिरात दोघांनी लग्न केलं. लग्ननंतर पवन आपल्या गावी म्याऊंला गेला. हे वाचा - या तरुणीच्या संपर्कात येतात कपलचे होतात ब्रेकअप; नेमकं काय आहे कारण? तरुणीने त्याला फोन करून त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तो फोनही उचलत नव्हता. तिने बरीच प्रतीक्षा केली अखेर ती म्याऊंला आली. नवऱ्याच्या गावी त्याच्या घरी पोहोचताच तिला जे दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्याच्याशी तिने लग्न केलं होतं, तो आधीपासूनच विवाहित होता. त्याची पत्नी घरात होती आणि त्यााल एक चार वर्षांचा मुलगाही आहे. हे समजताच तिला धक्काच बसला. हे वाचा - 'या' गावात लग्नानंतर विधवेच्या पोशाखात सासरी जाते नवरी; काय आहे कारण? तरुणीने अलापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर आरोपी पवन फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक करून त्याला तुरुंगात डांबलं आहे. झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार अलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस संजय कुमार सिंह यांनी सांगितलं की, पहिल्या पत्नीला फसवून दुसरं लग्न करणाऱ्या या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आलं, आता जेलमध्ये डांबण्यात आलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Marriage, Uttar pradesh, Wedding

    पुढील बातम्या