अयोध्या प्रकरण: युपी सरकारनं केली नव्या मशिदीसाठी ‘या’ पाच जागांची पाहणी!

अयोध्या प्रकरण: युपी सरकारनं केली नव्या मशिदीसाठी ‘या’ पाच जागांची पाहणी!

सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात नव्या मशिदीसाठी अयोध्येबाहेर सरकारच्या वतीनं पाच एकरची जागा देण्यात यावी असे सांगितले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : उत्तर प्रदेश सरकारनं मशिदीसाठी मुस्लीम पक्षकारांसाठी नवीन जागा देण्याचे निश्चित केले आहे. यासाठी पाच जागांची पाहणीही करण्यात आली आहे. मात्र या पाच जमिनी अयोध्येच्या बाहेर आहेत. पंचकोशी परिक्रमा हा 15 किमीचा परिघ आहे जो अयोध्याचा पवित्र प्रदेश मानला जातो. सध्या प्रशासनाने पाहणी केलेल्या पाच जमिनी या पंचकोशी परिक्रमेच्या बाहेर आहेत.

या पाच जागांची केली पाहणी

अयोध्या प्रशासनाने मशिदीसाठी मलिकपुरा मिर्झापूर, शमशुद्दीनपूर आणि चांदपूर या गावांची पाहणी केली आहे. या सर्व जमिनी अयोध्यापासून वेगवेगळ्या शहरांना जोडणार्‍या मुख्य रस्त्यावर आहेत. सर्वांच्या संमतीनंतर सरकार ही जमीन मुस्लीम पक्षकारांच्याच्या ताब्यात देणार आहे.

वाचा-राष्ट्रवादीत स्पर्धा सुरू असताना शरद पवारांचं धक्कातंत्र, पक्षात नाराजी?

9 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयानं दिला होता ऐतिहासिक निर्णय

अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असून काही अटी शर्तीच्या आधारावर ती हिंदुंना मिळणार आहे. मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिला आहे. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपला निकाल दिला होता. आतील भाग अद्यापही वादग्रस्त असून ती जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल, यासाठी केंद्र सरकारने आगामी तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले होते. तर, नव्या मशिदीसाठी अयोध्येबाहेर सरकारच्या वतीनं पाच एकरची जागा देण्यात यावी असे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उत्तर प्रदेश सरकार जमिनींच्या शोधात होती. त्यामुळं आता मलिकपुरा मिर्झापूर, शमशुद्दीनपूर आणि चांदपूर या गावातील जमिनींची पाहणी करण्यात आली आहे.

वाचा-…तर गौतम गंभीर देणार खासदारकीचा राजीनामा!

जमीन घेण्याबाबत मुस्लीम पक्षात एकमत नाही

त्याचबरोबर, मुस्लिम बाजूने मशिदीसाठी जमीन घेण्याबाबत एकमत नाही. काही दिवसांपूर्वी अयोध्या प्रकरणाशी संबंधित पक्षांमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी संबंधित पक्षांनी सांगितले होते की त्यांना पाच एकर जमीन नको आहे. मात्र, अयोध्या प्रकरणाशी संबंधित मुख्य पक्षाचा हाशिम अन्सारी यांचा मुलगा इक्बाल अन्सारी हे जमीन घेण्याच्या बाजूने होते.

वाचा-ठरलं! ‘या’ तारखेपासून सुरू होणार IPLचा धमाका, मुंबईत पडणार चौकार-षटकारांचा पाऊस

बाबरी मशिदीचे अवशेष मागण्याची मुस्लीम पक्षकारांची मागणी

बाबरी मशिदीचे अवशेष अजूनही विवादित जागेरवर आहेत. त्यामुळं कृती समितीनं हे अवशेष सुपुर्द करण्याची मागणी केली आहे. समितीचे संयोजक अ‍ॅडव्होकेट जफर्याब जिलानी यांनी याआधी, पुनर्विचार याचिकेवर सुनावणी झाली असली तरी 1992मध्ये बाबरी मशिद उद्धवस्त करण्याच्या कृतीला न्यायालयानं बेकायदेशीर होते. त्यामुळं मोडकळीस आलेले साहित्या, इतर बांधकाम साहित्य जसे दगड, दांडे इत्यादी अवशेष मुसलमानांच्या ताब्यात देण्यात द्यावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2019 12:11 PM IST

ताज्या बातम्या