लज्जास्पद ! सेक्सला नकार देणाऱ्या पत्नीची हत्या, यानंतर पतीनं स्वतःचं गुप्तांगही कापलं

Crime News पत्नीनं शारीरिक संबंधास नकार दिल्यानं पतीनं तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 10:04 PM IST

लज्जास्पद ! सेक्सला नकार देणाऱ्या पत्नीची हत्या, यानंतर पतीनं स्वतःचं गुप्तांगही कापलं

लखनौ, 7 जुलै : पत्नीनं शारीरिक संबंधास नकार दिल्यानं पतीनं तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला जीवे ठार करूनही आरोपीचा इथंवरच थांबला नाही तर त्यानं स्वतःचं गुप्तांगदेखील कापलं. अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या आरोपी युवकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अनवारुल हसन असं आरोपीचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील ही थरकाप उडवणारी घटना आहे.

(पाहा :VIDEO : पत्याच्या बंगल्याप्रमाणे नाशिकमध्ये वाडा कोसळला)

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन आपल्या पत्नीसह घरी होता. यावेळेस त्यानं पत्नीकडे शारीरिक संबंध करण्याची ईच्छा व्यक्त केली. पण तिनं नकार दिला. पत्नीनं नकार दिल्याबरोबर त्याचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरातच त्यानं तिचा गळा दाबून हत्या केली. एवढंच नाही तर स्वतःचं गुप्तांगदेखील कापून घेतलं.

(पाहा :VIDEO : दिव्यांग तरुणावर रानडुकराचा जीवघेणा हल्ला)

गुजरातच्या सूरत येथे काम करणाऱ्या हसनचं वर्षभरापूर्वी 20 वर्षीय युवतीसोबत लग्न झालं होतं. काही दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. शनिवारी (6 जुलै) सकाळी त्याची पत्नी जमिनीवर निपचित पडलेली होती,  तर दुसरीकडे हसन जखमी अवस्थेत शेजाऱ्यांना दिसला. यानंतर शेजऱ्यांनी तातडीनं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. कसून तपास केल्यानं पोलिसांना ही धक्कादायक बाब समजली.

Loading...

SPECIAL REPORT : दिल्लीनंतर थेट शेती, नवनीत राणांची अशीही बांधिलकी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 10:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...