वासनांध बापानं 2 वर्षे मुलीवर केला बलात्कार, विरोध केल्यानंतर शरीराचे केले तुकडे

पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका नराधम बापाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 09:40 AM IST

वासनांध बापानं 2 वर्षे मुलीवर केला बलात्कार, विरोध केल्यानंतर शरीराचे केले तुकडे

लखनौ, 18 ऑगस्ट : पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका नराधम बापाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा वासनांध बाप गेल्या दोन वर्षांपासून मुलीवर वारंवार बलात्कार करत होता. सतत होणाऱ्या या अत्याचाराला कंटाळून पीडितेनं प्रतिकार केला त्यावेळेस आरोपीनं तिची हत्या केली. ही पीडित तरुणी 19 वर्षांची होती. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. आपण केलेला गुन्हा उघड होऊ नये यासाठी आरोपीनं मुलीच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले. तिचं शीर शेतात पुरलं तर एका गोणत्यात धड टाकून ते नाल्यात फेकलं.

(वाचा : धक्कादायक! लग्नसोहळ्यात आत्मघाती बॉम्बस्फोट, 40 जणांचा जागीच मृत्यू)

पीडितेचं धड आणि शीर मिळालं  

एसएसपी. डॉ. सुनील कुमार गुप्ता यांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान आरोपीनं केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुलीचं धड आणि शीर शोधून काढलं. आरोपी गेल्या दोन वर्षांपासून आपल्या छोट्या मुलीवर वारंवार बलात्कार करत होता. 26 जुलै रोजी त्यानं रात्री मुलीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

(वाचा :वेटरनं सँडविच द्यायला केला उशीर, ग्राहकानं गोळ्या झाडून केली हत्या)

Loading...

(दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, VIDEO सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी)

महाराष्ट्रातील पंढरपुरातही अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पाच नराधमांनी 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. बलात्काराच्या या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला. या प्रकरणात आता पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 आरोपींपैकी पीडित तरुणी एकाची मैत्रीण होती. त्याने तिला एका अज्ञात स्थळी सुलभ शौचालयाजवळ बोलावलं. त्यानंतर पाचही आरोपींकडून तिच्यावर बलात्कारासाठी दबाव टाकण्यात आला. यातील एका आरोपीने तिला छेडलं तर दुसऱ्याने तिला दारू पाजली. त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. यात पाचव्या मुलाने सगळ्या प्रकरणाचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करू, अशी धमकी दिली.

बलात्काराचा व्हिडीओ शेअर होईल या भीतीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगतली नाही. याचाच फायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. तिच्याकडे पैशांची मागणीदेखील करण्यात आली. काही दिवसांनी पीडित तरुणीच्या घरी तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला आणि त्यानंतर तिच्या आईने विचारलं असता या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला.

SPECIAL REPORT: मुस्लिम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 09:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...