मराठी बातम्या /बातम्या /देश /

'Please मला शिवाशी बोलू द्या', गर्लफ्रेंडने थेट पोलिसांना फिरवला फोन, नेमकं काय प्रकरण

'Please मला शिवाशी बोलू द्या', गर्लफ्रेंडने थेट पोलिसांना फिरवला फोन, नेमकं काय प्रकरण

पोलीस स्टेशनमध्ये गर्लफ्रेंडचा फोन, पोलिसांची वाढली डोकेदुखी नेमकं काय प्रकरण

पोलीस स्टेशनमध्ये गर्लफ्रेंडचा फोन, पोलिसांची वाढली डोकेदुखी नेमकं काय प्रकरण

पोलीस स्टेशनमध्ये गर्लफ्रेंडचा फोन, पोलिसांची वाढली डोकेदुखी नेमकं काय प्रकरण

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

लखनऊ : अलीकडच्या काळात फसवणुकीशी (Fraud) संबंधित गुन्ह्यांचं (Crime) प्रमाण वाढलं आहे. आर्थिक, नात्याच्या अनुषंगाने किंवा खरेदी-विक्रीबाबत फसवणूक झाल्याचं आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. सध्या उत्तर प्रदेशातलं (Uttar Pradesh) फसवणुकीचं एक प्रकरण असंच चर्चेत आहे. या प्रकरणात एका व्यक्ती स्वतः सैनिक असल्याचं भासवत अनेक तरुण मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होती. पोलिसांनी या तोतया सैनिकाला (Imposter soldier) अटक केली आहे; मात्र अटकेनंतर पोलिसांची (Police) डोकेदुखी वाढली आहे. अर्थात यामागे कारणही काहीसं विचित्र आहे.

उत्तर प्रदेशातल्या बरेली कँटोन्मेंटचे (Bareilly Cantonment) पोलीस एका विचित्र समस्येत अडकले आहेत. मंगळवारी (23 ऑगस्ट) लष्कराच्या गुप्तचर विभागाने (Army Intelligence) फिरोजाबादमधल्या विजयपूर भिकमपूर येथे राहणाऱ्या सुनील यादव ऊर्फ शिवा नावाच्या व्यक्तीला कँटोन्मेंट परिसरातून अटक केली.

18 वर्षांचा तरुण अन् महिला 48; प्रेम प्रकरण जुळलं अन् लेकीचा केला भयंकर शेवट!

गुप्तचर विभागाला कँटोन्मेंट भागात एक तोतया सैनिक राहत असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने सुनीलवर संबंधित विभागाने अनेक दिवसांपासून पाळत ठेवली होती. सुनीलचा फेसबुक आयडी (Facebook ID) तपासला असता, त्यात त्याचे लष्कराच्या गणवेशातले अनेक फोटो मिळाले. त्यानंतर गुप्तचर विभागाचे कर्मचारी कँटोन्मेंटमधल्या शिवाच्या पत्नीकडे गेले. तिथं शिवाला अटक करण्यात आली. त्या वेळी शिवाकडून बनावट आयडी, विदेशी चलानासह काही वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी शिवाची रवानगी कारागृहात केली.

सख्ख्या भावांकडून मुंबईत राहणाऱ्या बहिणीवर बलात्कार करून हत्या, आजीसोबतही अमानुष कृत्य

दरम्यान, शिवाला अटक केल्याचं समजताच त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्सनी (Girlfriends) कँटोन्मेंट पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर राजीव कुमार सिंह यांना फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. या गर्लफ्रेंड्स फोन करून राजीव सिंह यांच्याकडे वारंवार `आम्हाला शिवाशी बोलायचं आहे, कृपया मला शिवाशी बोलू द्या,` अशी मागणी करू लागली. अशा प्रकारचे फोन वारंवार येत असल्याने राजीव सिंह संतापले आणि त्यांनी अखेरीस सांगितलं की, `शिवा आता पोलीस स्टेशनमध्ये नसून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.` यानंतर राजीव सिंह यांना शिवाच्या गर्लफ्रेंड्सचे फोन येणं बंद झालं.

`अनेक तरुणी शिवाविषयी माहिती घेण्यासाठी मला फोन करत होत्या,` अशी माहिती राजीव सिंह यांनी दिली. `मी तरुणींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी लष्कराचा गणवेश परिधान करत होतो,` अशी माहिती आरोपी शिवानं दिली. शिवा लष्करात सैनिक असल्याचं भासवत असल्यानं त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या; पण या प्रकरणात पोलिसांची डोकेदुखी काही काळ वाढली होती. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Girlfriend, Uttar pradesh