Home /News /national /

धक्कादायक! आईच्या मृतदेहाजवळ 4 महिने बसून होती मुलगी

धक्कादायक! आईच्या मृतदेहाजवळ 4 महिने बसून होती मुलगी

काही वर्षांपूर्वी व्हि. के. टंडन यांच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलगी दोघंच घरी राहात होते.

    बाराबंकी, 17 ऑगस्ट : आईच्या मृतदेहाजवळ तब्बल चार महिने बसून राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशात बाराबंकी जिल्ह्यात हा प्रकार समोर आला आहे. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून माय-लेकी दिसत नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला आणि धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी दार उघडल्यानंतर भयानक प्रकार समोर आला. आईच्या मृतदेहाजवळ मुलगी घट्ट पकडून तशीच बसून होती. या मृतदेहाचं सांगाड्यात रुपांतर झालं होतं. मुलगी जागची उठायला तयार नव्हती. पोलिसांनी हा सांगाडा ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर मुलीला मानसिक स्थिती नीट नसल्याचं पोलिसांनी माहिती दिली आहे. हे वाचा-आजीबाई जोरात..! 93 व्या वाढदिवशी Aankh Maarey गाण्यावर धमाल डान्स, पाहा VIDEO काही वर्षांपूर्वी व्हि. के. टंडन यांच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलगी दोघंच घरी राहात होते. मुलगी तशी कोणात विशेष मिसळून राहात नव्हती. अनेक दिवसांपासून दोघं मायलेकी दिसल्या नाहीत. त्यावर अजूबाजूच्या लोकांनी काहीतरी गडबड असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी तातडीनं घर गाठलं आणि दवाजा तोडल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. पोलिसांना मुलगी आईच्या मृतदेहाजवळ बसून असलेली दिसली तर मृतदेहावर ब्लँकेट आणि चादर घातली होती. या घराला बाहेरून कुलूप होतं. त्यामुळे कुलूप तोडून पोलिसांना घरात जावं लागल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या