मराठी बातम्या /बातम्या /देश /केवळ एका Pizza साठी तरुणीनं दिला जीव; उत्तरप्रदेशातील धक्कादायक घटना

केवळ एका Pizza साठी तरुणीनं दिला जीव; उत्तरप्रदेशातील धक्कादायक घटना

वाढदिवसाला आई-वडिलांनी Pizza न दिल्याने तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, गळफास घेत संपवलं आयुष्य (प्रातिनिधिक फोटो)

वाढदिवसाला आई-वडिलांनी Pizza न दिल्याने तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, गळफास घेत संपवलं आयुष्य (प्रातिनिधिक फोटो)

आई-वडिलांनी पिझ्झा (Pizza) दिला नाही म्हणून आत्महत्या (Suicide) करण्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : अलीकडच्या काळात लहान मुलांमध्ये (Children) वाढलेली हिंसात्मकता, आक्रमकता चिंतेचा विषय ठरला आहे. अगदी लहानसहान कारणावरून जीव देण्याच्या घटनाही वाढलेल्या दिसत असून, अगदी 10 -12 वर्षांची मुलंदेखील छोट्या छोट्या कारणांवरून खून करण्यासारखे गुन्हे करत असल्याचं आढळत आहे. आई-वडिलांनी एखादी गोष्ट लगेच दिली नाही तर ही लहान मुलंसुद्धा खूप आक्रमक होत असल्याचं तसंच रागाच्या भरात टोकाची भूमिका गाठत असल्याचे दिसत आहे. पिझ्झा न मिळाल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार आता समोर आला आहे.

  संयमाचा अभाव, अती राग, आक्रमकपणा तसंच नैराश्य (Depression) आणि रागाने जीव देण्यापर्यंत मजल मारण्याची ही वाढती प्रवृत्ती सामाजिक अस्वास्थाचे दर्शन घडवत आहे. नुकत्याच उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडलेल्या एका घटनेनं या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित केलं आहे. उत्तरप्रदेशमध्ये एका 18 वर्षांच्या तरुणीनं वाढदिवसानंतर अवघ्या दोनच दिवसात आई-वडिलांनी पिझ्झा (Pizza) दिला नाही म्हणून आत्महत्या (Suicide) करण्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  वाचा : गाडीला कट मारल्याने झाला वाद, बेदम मारहाण झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

  उत्तरप्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यात तालाबपुरा परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय शिखा सोनी (Shikha Soni) हिनं गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शिखाच्या आत्महत्येमागे हे क्षुल्लक कारण समोर आले.

  शिखाचे वडील मोहनलाल सोनी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूआधी दोनच दिवसांपूर्वी 10 ऑक्टोबर रोजी शिखाचा वाढदिवस (Birthday) साजरा करण्यात आला होता. त्यावेळी तिनं पिझ्झा ऑर्डर करण्याचा हट्ट धरला होता,पण वाढदिवसादिवशी पिझ्झा मागवण्याऐवजी दुसऱ्या दिवशी मागवण्याची सूचना आई-वडिलांनी केली. पण नंतर काही कारणांनी त्या दोन दिवसांत पिझ्झा मागवणं जमलं नाही. सोमवारी याच विषयावरून पुन्हा चर्चा झाली तेव्हा शिखाच्या आईनं तिला आणखी काही दिवस वाट पहायला सांगितलं. त्यामुळं नाराज झालेल्या शिखानं आपल्या खोलीत जाऊन पंख्याला लटकून गळफास घेतला. थोड्या वेळानं तिच्या खोलीत डोकावून पाहिलं असता तिनं गळफास लावून घेतल्याचं दिसून आलं.

  वाचा : दत्ताचा अवतार सांगत फसवणूक, डोंबिवलीतील इसमाला 24 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक

  शिखा घरात सर्वांत लहान होती. तिला दोन मोठ्या बहिणी आहेत. शिखाने नुकताच नर्सिंगचा (Nursing) कोर्स पूर्ण केला होता आणि जिल्हा रुग्णालयात तिचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण सुरू होतं. मात्र अशा क्षुल्लक कारणामुळे शिखाने आत्महत्या केल्यानं तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. रडूनरडून त्यांची अवस्था बिकट झाली असून, पिझ्झा दिला नाही म्हणून लाडक्या लेकीनं जीव दिल्यानं त्यांचा सुरू असलेला आक्रोश सर्वांना हेलावून टाकत आहे.

  दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू केला आहे. फक्त एका पिझ्झामुळे आत्महत्या करण्याच्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  First published:

  Tags: Crime, Pizza, Suicide, Uttar pradesh