सैराट पार्ट-2! लेकीसोबत प्रेमविवाह केला म्हणून जावयाला बनवला कुत्रा आणि...

सैराट पार्ट-2! लेकीसोबत प्रेमविवाह केला म्हणून जावयाला बनवला कुत्रा आणि...

प्रेमविवाह केला म्हणून जावयाला लेकीच्या घरच्यांनी दिली शिक्षा, व्हिडिओ काढून केला व्हायरल.

  • Share this:

गाझियाबाद, 24 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. एका कुटुंबाने चक्क आपल्या लेकीनं प्रेमविवाह केला तिच्या पतीला निर्घृणपणे मारहाण केली. त्यांनी मुलीच्या आणि तिच्या पतीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून त्यांना ओढले. गेल्या वर्षी मे महिन्यात काढलेला एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आणि या घटनेचा तपास सुरू करण्यात आला.

एवढेच नाही तर या दोघांना ओढल्यानंतर त्यांना कुत्र्यासारखे भुंकायलाही सांगितले. या प्रकार व्हिडिओमधून उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. मारहाण केलेल्या तरुणाचे नाव इक्रामुद्दीन असून मे 2019मध्ये त्यांना मारहाण करण्यात आली होती. इक्रामुद्दीनने नुकतीच एएनआयला दिलेल्या माहितीत, "माझ्या पत्नीच्या नातलगांनी मला उचलून आणले, कारण आम्ही प्रेमविवाह केला होता. हे त्यांना आवडले नव्हते. म्हणून त्यांनी मला मारहाण केली. हा व्हिडिओ मे 2019मध्ये शूट करण्यात आला होता.", असे सांगितले.

वाचा-'व्हॅलेंटाइन डे'ला लग्न आणि 8 दिवसांत मृत्यू, नवविवाहित तरुणीसोबत नेमकं काय घडलं

पत्नीचा धाकटा भाऊ हवालदार असल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोपही इकरमुद्दीन यांनी केला. ते म्हणाले, "पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, कारण माझ्या पत्नीचा भाऊ पोलीस आहे." या सगळ्यावर गाझियाबाद पोलीस स्थानकाचे हवालदार प्रभात कुमार यांनी, "आम्हाला नुकताच हा व्हिडिओ मिळआला. आम्ही चौकशी करू. एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.", असे सांगितले.

वाचा-हॉट सुपरमॉडेल ते फर्स्ट लेडी! अशी झाली होती मेलेनिया आणि ट्रम्प यांची भेट

वाचा-मुलाने डोळ्यांदेखत पाहिले आईचे अनैतिक संबंध, नवऱ्याला कळायच्या आत असं संपवलं

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर अद्याप कारवाई केलेली नाही, असे सवाल विचारले जात आहेत.

First published: February 24, 2020, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading