• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • तुझ्यासाठी जीव झाला येडा पिसा! महिला पोलीस गँगस्टरच्या प्रेमात घायाळ, सगळं विसरून थाटलं लग्न

तुझ्यासाठी जीव झाला येडा पिसा! महिला पोलीस गँगस्टरच्या प्रेमात घायाळ, सगळं विसरून थाटलं लग्न

बॉलिवूड सिनेमा 'गुनाह' (Gunaah)शी मिळतीजुळती प्रेमकहाणी खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळाली आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबल एका गँगस्टरच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली.

 • Share this:
  लखनौ, 8 ऑगस्ट : बॉलिवूड सिनेमा 'गुनाह' (Gunaah)शी मिळतीजुळती प्रेमकहाणी खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळाली आहे. महिला पोलीस कॉन्स्टेबल एका गँगस्टरच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली. या गँगस्टरच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली की तिनं थेट त्याच्यासोबत लग्नगाठच बांधण्याचा निर्णय घेतला. राहुल ठसराना असं गँगस्टरचं नाव आहे. या दोघांच्या आगळ्यावेगळ्या प्रेम कहाणीमुळे 2002 साली मोठ्या पडद्यावर झळकलेल्या 'गुनाह' (Gunaah)सिनेमाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या सिनेमातही अभिनेत्री बिपाशा बसू पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका तर अभिनेता डीनो मोरियानं आरोपीचं पात्र साकारलं होतं. सिनेमामध्ये या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम असतं. अशीच काहीशी कहाणी गँगस्टर राहुल आणि उत्तर प्रदेशातील महिला कॉन्स्टेबलमध्येही दिसली. आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांनीही सर्व कायदे-नियम विसरुन विवाहसोहळा देखील रचला. दरम्यान, गँगस्टर राहुलवर 12 हून अधिक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. 2014 मध्ये बहुचर्चित मनमोहन गोयल हत्याकांड प्रकरणी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कायद्याचं रक्षण करणारे पोलीस आणि गुन्हेगार या दोघांमध्ये प्रेम फुलल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (वाचा : ...त्या रात्री अर्धनग्नावस्थेत पोहोचली पीडित तरुणी, पण मदतीऐवजी पोलिसांनी लावलं) अशी फुलली प्रेम कहाणी राहुल जेव्हा कारागृहात कैद होता तेव्हा ही महिला पोलीस कर्मचारी तेथेच आपलं कर्तव्य बजावत होती. यादरम्यान, दोघं मनानं एकमेकांच्या जवळ आले. कारागृह परिसरात दोघंही लपूनछपून भेटू लागले. यानंतर जशी कारागृहातून राहुलची सुटका झाली, तसं दोघांनीही थाटामाटात लग्न केलं. (वाचा : 'सॉरी आईबाबा, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही', तणावातून मुलाची आत्महत्या) राहुल आहे अनिल दुजाना गिरोहचा शार्प शूटर 2014 मधील मनमोहन गोयल हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अनिल गिरोहच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आरोपींमध्ये राहुलचाही समावेश होता. जमीन विवाद प्रकरणात कुख्यात गुंड अनिल दुजानानं आपल्या शार्प शूटर्सकडून व्यापारी गोयलची हत्या घडवून आणली होती. ऑटो चालक ते गँगस्टरपर्यंतचा प्रवास राहुल ठसरानानं 2008मध्ये गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकलं. यापूर्वी तो सिकंदराबादमध्ये रिक्षा चालकाचं काम करत होता. हे काम करत असतानाच त्याची गिरोहच्या गँगमधील सदस्यासोबत ओळख झाली. या सदस्यामार्फतच त्यानं गुन्हेगारी विश्वाची वाट धरली. पतीसमोरच पत्नीला लाठ्या-काठ्याने मारहाण, VIDEO व्हायरल
  Published by:Akshay Shitole
  First published: