पैशांवरून दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी, फिल्मी स्टाईलनं करण्यात हाणामारीचा VIDEO VIRAL

पैशांवरून दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी, फिल्मी स्टाईलनं करण्यात हाणामारीचा VIDEO VIRAL

मिळालेल्या माहितीनुसार हा वाद जुगारावरून झाल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई इथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

हरदोई, 20 नोव्हेंबर : जमीन किंवा छोट्या मोठ्या गोष्टींवरून दोन गटांमध्ये वाद होत असल्याचे काही व्हिडीओ दोन दिवसांत समोर आल्यानंतर आज आणखीन एक भयंकर व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुगार खेळण्यातून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. दोन गटांमध्ये तू-तू मैं-मैं झालं आणि या बाचाबाचीचं जीवघेण्या मारहाणीत रुपांतर झालं.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. लाठ्या-काठ्यांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. इतक कमी की काय तर एका तरुणानं हवेत उड्या मारत फिल्मी स्टाइलनं तुफान हाणामारी केली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-PUBG Mobile India खेळण्यासाठी करावं लागणार प्री-रजिस्ट्रेशन, अशी मिळणार एंट्री

मिळालेल्या माहितीनुसार हा वाद जुगारावरून झाल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन गटांमध्ये अक्षरश: रक्ताचे पाट वाहतात का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांवर गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी धरपकड सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 20, 2020, 10:54 AM IST

ताज्या बातम्या