Home /News /national /

थाट तर पाहा! ऑन ड्यूटी तक्रारकर्त्याकडूनच दाबून घेतले पाय; शेवटी भोगावी लागली कर्माची फळं

थाट तर पाहा! ऑन ड्यूटी तक्रारकर्त्याकडूनच दाबून घेतले पाय; शेवटी भोगावी लागली कर्माची फळं

शेवटी महिला पोलिसाला भोगावी लागली आपल्या कर्माची फळं...

  लखनऊ, 10 जानेवारी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) संभलमध्ये ड्यूटी दरम्यान एका व्यक्तीकडून पाय दाबून घेणं महिला पोलिसाला महागात पडलं आहे. ही व्यक्ती आपली तक्रार घेऊन आला होता, त्यावेळी खुर्चीवर आरामात बसलेल्या महिला पोलीस शबनमने त्याच्याकडून पाय दाबून घेतले. या संपूर्ण घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral on Social Media) होत आहे. यानंतर तिच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.
  पाय दाबून देत असताना महिला पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल... मिळालेल्या माहितीनुसार, संबलच्या या पोलीस ठाण्यातील तैनात महिला पोलीस शबनमचा दोन दिवसांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये महिला पोलीस खुर्चीवर आराम करीत फोनवर बोलत असताना दिसत होती. तिच्यासमोर खुर्चीवर बसलेली एक व्यक्ती तिचे पाय दाबून देत होती. ही व्यक्ती महिला पोलिसाकडे तक्रार घेऊन आली होती. मात्र महिला पोलिसाने मात्र त्या व्यक्तीला आपले पाय दाबून देण्याचं फर्मान सोडलं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी शबनमला पिंक चौकीचा प्रभारी बनवण्यात आलं होतं, मात्र एसपी मिश्र यांनी हा आदेश देखील थांबवला.
  या आधीदेखील आली होती चर्चेत... स्पष्टीकरण देत शबनममे सांगितलं की, तिच्या मानेभोवती वेदना होत असल्याने ती एक्यू प्रेशरचा उपचार करून घेत होती. तरी पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणात चौकशी केली जात आहे. यापूर्वी शबनमवर बरेलीमध्ये तैनात असताना एका हत्या प्रकरणात चर्चेत आली होती.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Crime news, Police, Uttar pardesh

  पुढील बातम्या