मराठी बातम्या /बातम्या /देश /

उत्तर प्रदेशमधल्या गोरखनाथ मंदिर हल्ल्याचं 1.648 KM कनेक्शन, नवी मुंबईत धाड सत्र

उत्तर प्रदेशमधल्या गोरखनाथ मंदिर हल्ल्याचं 1.648 KM कनेक्शन, नवी मुंबईत धाड सत्र

गोरखनाथ मंदिरावर हल्ला (Gorakhnath Temple Attack) करण्याचा कट रचणाऱ्या व्यक्तींबाबत गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence) उत्तर प्रदेश पोलिसांना 31 मार्च रोजी माहिती दिलेली होती.

गोरखनाथ मंदिरावर हल्ला (Gorakhnath Temple Attack) करण्याचा कट रचणाऱ्या व्यक्तींबाबत गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence) उत्तर प्रदेश पोलिसांना 31 मार्च रोजी माहिती दिलेली होती.

गोरखनाथ मंदिरावर हल्ला (Gorakhnath Temple Attack) करण्याचा कट रचणाऱ्या व्यक्तींबाबत गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence) उत्तर प्रदेश पोलिसांना 31 मार्च रोजी माहिती दिलेली होती.

लखनऊ, 05 एप्रिल: उत्तर प्रदेशातल्या (UP) गोरखपूर (Gorakhpur) इथल्या प्रसिद्ध गोरखनाथ मंदिरात (Gorakhnath Temple) रविवारी (3 एप्रिल 2022) संध्याकाळी घडलेल्या घटनेबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. सूत्रांनी CNN-News18 ला दिलेल्या माहितीनुसार, गोरखनाथ मंदिरावर हल्ला (Gorakhnath Temple Attack) करण्याचा कट रचणाऱ्या व्यक्तींबाबत गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence) उत्तर प्रदेश पोलिसांना 31 मार्च रोजी माहिती दिलेली होती. यामध्ये, या प्रकरणातला मुख्य आरोपी अहमद मुर्तझा अब्बासी (Ahmed Murtaza Abbasi) याच्यासह 16 जणांच्या प्रोफाइलचा समावेश होता. सूत्रानं सांगितलं, की मार्चच्या शेवटी राज्य पोलीस (State Police) आणि गुप्तचर अधिकारी यांच्यात एक बैठक झाली होती. त्यामध्ये शेअर केलेल्या प्रोफाइल्समध्ये आयआयटी पदवीधर मुर्तझा याचंही प्रोफाइल होतं. मुतर्झा यानं रविवारी संध्याकाळी गोरखनाथ मंदिराच्या दक्षिण गेटवर प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेब्युलरीच्या (पीएसी) दोन हवालदारांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. सुरक्षा कर्मचार्‍यांनी हल्लेखोराला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं असता त्यानं 'अल्लाहू अकबर' अशा घोषणा देऊन हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या हल्ल्याला दहशतवादी घटना (Terrorist Incident) म्हणता येईल, असं राज्याच्या गृह विभागानं म्हटले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे या मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. ते या ठिकाणी पूजा करण्यासाठी सतत येतात. त्यामुळे गोरखनाथ मंदिराजवळ झालेल्या या हल्ल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येचा थरार, गोळीबाराचा Live Video अहमद मुर्तझा अब्बासी हा आयआयटी बॉम्बेचा (IIT Bombay) माजी विद्यार्थी आहे. 8 ऑगस्ट 2015 रोजी 53व्या दीक्षांत समारंभात त्याला केमिकल इंजिनीअरिंग या शाखेची (Chemical Engineering) पदवी प्रदान करण्यात आली होती. यूपी एटीएस (UP ATS) टीम अहमद मुर्तझाच्या नवी मुंबईतल्या घरी चौकशीसाठी गेली होती. नवी मुंबईतलं हे घर मुर्तझानं चार वर्षांपूर्वीच विकल्याची माहिती या चौकशीत समोर आली. यूपी एटीएसची दोन जणांची टीम काल मुंबईत आली होती. ही टीम आज (5 एप्रिल 2022) दुपारी साडेबारा वाजताच्या फ्लाइटनं परतणार आहे. सानपाडा येथील मिलेनियन टॉवर नंतर आता सीवूड सेक्टर 50 मधील ताज हाईट्स मध्ये देखील तो राहत असल्याचं समोर आलं. 2015 ते 2020 पर्यंत अहमद मूर्तझा सीवूड येथे राहण्यास होता. 2020 साली लॉकडाऊनमध्ये संपूर्ण कुटुंब गोरखपूरला शिफ्ट झाले. एनआरआय पोलिसांकडून ताज हाईट्समधील रहिवाशांची विचारपूस सुरू करण्यात आली आहे. तसंच भाडेकरुंना भेटण्यासाठी अहमद मूर्तझाचे वडील 5 दिवसांपूर्वी आले होते. नेम प्लेट आणि उरलेले काही सामान घेऊन पुन्हा गोरखपूरला निघून गेले. "20 वर्षांपासून हा विचार...'', समृद्धी महामार्गावरुन काय म्हणाले देवेंद्र फडणवीस सूत्रांनी CNN-News18 ला सांगितलं, की अब्बासी इस्लामिक स्टेटलाही देणगी देत आहे. त्यानं आयएसआयएससाठी (ISIS) सीरियात पैसे पाठवल्याचाही आरोप आहे. त्याच्या डिजिटल फूटप्रिंटमुळे तो (इंटरनेट सर्च) अगोदरपासूनच गुप्तचर संस्थांच्या रडारवर होता. तो काही गंभीर कारवाया करण्याचा प्रयत्न करत असल्याचं नंतर उघड झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, गोरखपूर न्यायालयानं अहमद मुर्तझा अब्बासीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्याबाबत आणखी पुरावे गोळा करण्याचे काम तपास एजन्सी करत असून लवकरच त्यात मोठं यश मिळण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Uttar pradesh, Yogi Aadityanath

पुढील बातम्या