मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP Election Result 2022: या फोटोंमधल्या दोघांनी वाचवली काँग्रेसची लाज; नाहीतर मिळाला असता भोपळा

UP Election Result 2022: या फोटोंमधल्या दोघांनी वाचवली काँग्रेसची लाज; नाहीतर मिळाला असता भोपळा

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे फक्त दोन आमदार असतील. त्यात एक महिला आहे आणि दुसऱ्या आमदाराचं वेगळेपण हेच की त्यांचा नाराच 'पांच बार का हारा, वीरेंद्र बेचारा' असा होता. वाचा कोण आहेत काँग्रेसचे विजयी उमेदवार?

नवी दिल्ली, 10 मार्च: उत्तर प्रदेशात भाजपचा विजय ही बातमी आहे त्याहून मोठा पराजय काँग्रेसचा झाला ही खरी बातमी आहे. या मोठ्या आणि जुन्या पक्षाचे जेमतेम दोन उमेदवार उत्तर प्रदेशातून निवडून आले आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रदेशामधूनही पक्षाची दारुण हार झाली आहे. एवढं विरोधी वातावरण असतानाही विजयाचा गड सर करू शकले त्या उमेदवारांनी हे कसं साधलं हे पाहावं लागेल.

उत्तर प्रदेशातल्या महाराजगंज मतदारसंघात काँग्रेसला यश मिळालं आहे. हा काँग्रेसचा बालेकिल्लाच समजला जातो. इथल्या फरेंदा विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळाली आहे. तिथून काँग्रेसतर्फे रिंगणात होते वीरेंद्र चौधरी. या वीरेंद्र यांची ख्याती ही की, ते पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवून हरले होते. या वेळी मात्र त्यांच्या गळ्यात यशाची माळ पडली. तेही अशा वेळी जेव्हा त्यांच्या पक्षाच्या पदरी घनघोर अपयश पडलं आहे.

वीरेंद्र चौधरी या वेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असले तरी यापूर्वी तीन वेळा बसपकडूनही त्यांना तिकीट मिळालं होतं. काँग्रेसनेही यापूर्वी दोन वेळा त्यांना उमेदवारी दिली होती. पण पाचही वेळी ते निवडणूक हरले होते. 'पांच बार हारा वीरेंद्र बेचारा' असा नाराच त्यांच्याविषयी या वेळी दिला जात होता. तेच वीरेंद्र या वेळी मात्र निवडणूक जिंकले आहेत.

Assembly Election: पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षांनी किती पैसा खर्च केला? वाचा डिटेल्स

काँग्रेसच्या दुसऱ्या विजयी उमेदवार आहेत आराधना मिश्रा. काँग्रेसचे दिग्गज नेते प्रमोद तिवारींची ही मुलगी. आराधना यांच्यासाठी हा विजय तसा सोपा होता. रामपूर खास मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात समाजवादी पार्टीने या मतदारसंघात आपला उमेदवार दिलाच नव्हता. नागेश प्रताप हे त्यांच्याविरोधातले भाजपचे उमेदवार होते. 1980 पासून हा काँग्रेसचा गड मानला गेला आहे. प्रमोद तिवारींना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. म्हणूनच आराधना मिश्रा यांचा विजय सोपा मानला जात होता.

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या 403 जागांपैकी 202 जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत. भाजपने 268 जागांपर्यंत मजल मारली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार समाजवादी पक्षाला 130 जागा मिळाल्या आहेत.

काँग्रे आणि बसपचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.

First published:

Tags: Assembly Election, Uttar pradesh, काँग्रेस