Home /News /national /

UP Election 2022: ऐनवेळी तिकीट नाकारलं; बसपा नेता ढसाढसा रडला, पाहा VIDEO

UP Election 2022: ऐनवेळी तिकीट नाकारलं; बसपा नेता ढसाढसा रडला, पाहा VIDEO

निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नारााज झालेला नेता चक्क ढसाढसा रडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना आहे उत्तरप्रदेशातील मुजफ्परनगर येथील. (BSP Arshad Rana cries after party denied ticket)

    लखनऊ, 15 जानेवारी : निवडणुकीत तिकीट (Election ticket) मिळवण्यासाठी दिग्गज नेत्यांकडून फिल्डिंग लावण्यात येत असते. आपल्याला उमेदवारी मिळावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, एकावेळी पक्षाकडून एकालाच उमेदवारी मिळते आणि त्यामुळे इतर इच्छूक नाराज होतात. सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. त्याच दरम्यान ऐनवेळी तिकीट नाकारल्याने एका नेत्याला अश्रू अनावर झाले अन् तो ढसाढसा रडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल (Video goes viral) होत आहे. उत्तरप्रदेशातील मुझप्फरनगर येथील ही घटना आहे. (Uttar Pradesh Election 2022 BSP Arshad Rana bitterly cries after party denied ticket) उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते अर्शद राणा यांचा हा व्हिडीओ आहे. ऐनवेळी तिकीट नाकारल्याने ते ढसाढसा रडले. तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्षावर गंभीर आरोप सुद्धा केला आहे. पश्चिम उत्तरप्रदेशचे प्रभारी शमसुद्दीन राईन यांनी तिकीट देण्याच्या नावाखाली 67 लाख रुपये हडप केल्याचा आरोप अर्शद राणा यांनी केला आहे. वाचा : भाजपला मोठे धक्के, 2 मंत्री, 6 आमदार, 12 माजी आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी इतकेच नाही तर अर्शद राणा यांनी शमसुद्दीन राईन यांच्याविरोधात पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे. याच दरम्यान पोलीस ठाण्याच्या आवारात अर्शद राणा हे ढसाढसा रडू लागले. बसपाने एक तमाशा बनवला आहे. राईन याने मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि म्हणतो की तुमच्या जागी दुसऱ्याला उमेदवारी देत आहोत. तुम्ही पाहातच असाल की मी वृत्तपत्र आणि होर्डिंगवर खर्च करत आहे पण शेवटच्या क्षणी मला उमेदवारी नाकारली. आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. यासोबतच अर्शद राणा म्हणाले, मी गेल्या 24 वर्षांपासून बसपाचा कार्यकर्ता आहे. अनेक पदांवर आतापर्यंत काम केले आहे. 2018 मध्ये चरथावल विधानसभा निवडणुकीच्या वेळी मला 2022 साठी प्रभारी आणि उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. आपल्याला उमेदवारी नाकारल्यानंतर अर्शद राणा यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं, बहुजन समाज पक्षाचे पश्चिम प्रभारी शमसुद्दीन राईन यांनी निवडणुकीच्या नावावर माझ्याकडून घेतलेले पैसे परत केले नाहीत तर मी बसपा अध्यक्षांच्या निवास्थानी आत्मदहन करेन. शमसुद्दीन राईन यांनी चरथावल विधानसभा कार्यक्रमा दरम्यान आगामी निवडणुकीसाठी माझ्या नावाची घोषणा केली होती असंही अर्शद राणा यांनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Election, UP Election, Uttar pardesh, Video viral

    पुढील बातम्या