Home /News /national /

मालकीणीची अंतयात्रा पाहून अश्रू अनावर, भावुक झालेल्या श्वानानं काय केलं वाचा

मालकीणीची अंतयात्रा पाहून अश्रू अनावर, भावुक झालेल्या श्वानानं काय केलं वाचा

श्वानाचं मालकीणीवरील हे निस्सीम प्रेम पाहून सर्वांच्या डोळे पाणावले.

    कानपूर, 03 जुलै: सर्वात जास्त लळा लावणारा आणि इमादार प्राणी म्हणून श्वान ओळखला जातो. याच श्वानाला आपल्या मालकीचं अचानक जाण्याचा खूप मोठा धक्का बसला. आपल्या मालकीणीची अंत्ययात्रा पाहून श्वान भावुक झाला आणि त्यानंही टोकाचा निर्णय घेतला. श्वानाचं मालकीणीवरील हे निस्सीम प्रेम पाहून सर्वांच्या डोळे पाणावले. या श्वानाची सध्या तुफान चर्चा होत आहे. आपल्या मालकीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं श्वानानं अंत्ययात्रा पाहून चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आपलं आयुष्यही संपवलं. मालकीणीसोबत या श्वानाची अंत्ययात्रा निघाली. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना कानपूरच्या बर्रा परिसरातील आहे. या पाळीव श्वानाचे नाव जया असे ठेवले होते. जेव्हा तिने तिच्या मालकीणीचा मृतदेह पाहिला तेव्हा ती कोलमडून गेली. आपल्या मालकीणीचं अचानक आपल्याला या जगातून सोडून जाणं सहन न झाल्यानं तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. हे वाचा-VIDEO: माज उतरवला! चिनी सैन्याच्या खतरनाक स्टंटला असं दिलं भारतीयांनी उत्तर या श्वानाला अंत्ययात्रेला न नेता चौथ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. शोक अनावर न झाल्यानं श्वान भुंकत राहिला. आपल्या मालकीणीला पाहण्यासाठी जीवाचा आटापिटा करत राहिला. अखेर शोक अनावर झाल्यानं त्यानं चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार कदाचित त्यानं शेवटचं आपल्या मालकीणीला पाहिलं नसावं पण त्यांच्यातलं हे प्रेम त्यांना वेगळं करू शकलं नाही. दोघांनीही एकत्र जगाचा निरोप घेतला. डॉ.अनिता सिंग हे आरोग्य विभागात सहसंचालक होत्या. त्यांचे पती हमीरपूर हे सीएमओ आहेत. तर त्याचा मुलगा तेजस देखील डॉक्टर आहे. अनिता या बऱ्याच दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंज देत होत्या मात्र त्यांचं बुधवारी निधन झालं. डॉ तेजस सांगतात की डॉ. अनीता 13 वर्षांपूर्वी हा श्वान केपीएम रुग्णालयात आजारी अवस्थेत मिळाला होता. त्याला घरी आणले आणि उपचार केले. यानंतर त्यांनी त्याचे नाव जया ठेवले. या श्वानाचं आईवर अपार प्रेम होतं. आईची वाट पाहात हा श्वान दाराकडे उभा राहायचा. मात्र आपली मालकीण अचानक जाणं हा त्याच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Dog, Kanpur, Uttar pradesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या