मराठी बातम्या /बातम्या /देश /‘ताडी प्यायल्यानं कोरोना होत नाही, ती गंगाजलापेक्षा शुद्ध’, बसपा नेत्याची जीभ घसरली

‘ताडी प्यायल्यानं कोरोना होत नाही, ती गंगाजलापेक्षा शुद्ध’, बसपा नेत्याची जीभ घसरली

कोरोना व्हायरसवरील (Coronavirus) औषधावर सध्या जगभर संशोधन सुरु आहे.  ते औषध सापडल्याचा दावा एका राजकीय नेत्यानं केला आहे.

कोरोना व्हायरसवरील (Coronavirus) औषधावर सध्या जगभर संशोधन सुरु आहे. ते औषध सापडल्याचा दावा एका राजकीय नेत्यानं केला आहे.

कोरोना व्हायरसवरील (Coronavirus) औषधावर सध्या जगभर संशोधन सुरु आहे. ते औषध सापडल्याचा दावा एका राजकीय नेत्यानं केला आहे.

बलिया (उत्तर प्रदेश), 23 डिसेंबर : कोरोना व्हायरसवरील (Coronavirus) औषधावर सध्या जगभर संशोधन सुरु आहे. जगातील शास्त्रज्ञ गेल्या काही महिन्यांपासून जे औषध तयार करण्यासाठी अक्षरश: युद्धपातळीवर काम करत आहेत, ते औषध सापडल्याचा दावा एका राजकीय नेत्यानं केला आहे. त्यांनी ‘ताडी प्यायल्याने कोरोना होत नाही,’ असा दावा त्यांनी केला आहे. भीम राजभर (Bhim Rajbhar)  असे या राजकीय नेत्याचे नाव असून ते बहुजन समाज पार्टीचे (BSP) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) अध्यक्ष आहेत.

काय म्हणाले राजभर?

भीम राजभर यांची एका कार्यक्रमात बोलताना जीभ चांगलीच घसरली. त्यांनी सुरुवातीला ताडीची तुलना गंगा नदीच्या (River Ganga) पाण्याशी केली.  ताडी गंगाजलपेक्षा शुद्ध असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. राजभर एवढ्यावरच थांबले नाहीत. ‘ताडाचं झाड हे जगातील हे प्राचीन झाड आहे. राजभर समाज ताडीच्या उद्योगातूनच आपले उदरभरण करतो. ताडी प्यायल्याने  शरिरातील प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे कोरोना (COVID-19) होत नाही,’ असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

(हे वाचा-आता विसरा फूड डिलिव्हरी ॲप्स! थेट WhatsApp वरून करता येईल McD ची ऑर्डर)

राजभर हे उत्तर प्रदेश बसपा अध्यक्ष झाल्याबद्दल बलियामध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांचे ताडी प्रेम ओसंडून वाहत होते. “कोरोनापासून बचाव करायचा असेल तर ताडी प्या. ताडी प्यायल्यानंतर कोरोना होत नाही. ताडी कोरोनावर मात करते. आज राजभर समाज ताडीमुळे अनेक अडचणीनंतरही तग धरुन आहे,’’ असा दावा त्यांनी केला.

राज्यभर पडसाद

राजभर यांच्या या वक्तव्याचे उत्तर प्रदेशात पडसाद उमटले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मत्री आणि सुहलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी भीम राजभर यांना उत्तर दिले आहे. ‘काही जण वायफळ बडबड करुन राजभर समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत, लोकांनी अशा मंडळीपासून सावध राहावं,’ असा टोला ओमप्रकाश राजभर यांनी लगावला आहे.

(हे वाचा-सोशल साइट्सवर स्वस्त सामान दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक)

कोरोनाचा धोका कायम

देशातील अन्य राज्यांप्रमाणे उत्तर प्रदेशातही अजून कोरोना व्हायरसचा धोका कायम आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 13 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 8 हजार 224 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 76 हजार 832 वर पोहचली आहे.

First published:

Tags: Covid19, Uttar pardesh