Home /News /national /

एकाच वेळी सापडले 16 डेंग्यूचे रुग्ण आणि 5 मृत्यू; लोक गाव सोडून पळाले

एकाच वेळी सापडले 16 डेंग्यूचे रुग्ण आणि 5 मृत्यू; लोक गाव सोडून पळाले

संपूर्ण गावात दहशत पसरली असून गावातील लोकांनी पलायन केलं आहे. नेमका किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती लोक सध्या आजारी आहेत याबाबात प्रशानाकडे कुठलीही माहिती नाही.

    दिल्‍ली, 6 सप्टेंबर : Coronavirus चा धोका कायम असताना आता डेंग्यू, मलेरियासारख्या साथ आजारांनीही डोकं वर काढलं  आहे. अचानक मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण (Dengue) सापडल्याने गावकाऱ्यांनी गावातून पलायन (Escape) केलं असून जिल्हा प्रशासनाने अजूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली नाही.  फिरोजाबादमधील कुरसौली (Kursauli) या एकट्या गावात 16 डेंग्यूचे रुग्ण सापडले आहे तर 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. श्रीराम प्रजापती आणि पूजा नावाच्या एका मुलीच्या मृत्यूनंतर हा आजार परिसरात पसरल्याचं बोललं जात आहे. संपूर्ण गावात दहशत पसरली असून गावातील लोकांनी पलायन केलं आहे. फिरोजाबादनंतर हा आजार आता कानपुर जिल्ह्यात पसरत आहे कानपुरात आतापर्यंत 40 लोकांना हा आजार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. दवाखान्यांत रूग्णांची गर्दी वाढली असून आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु आता यावर स्थानिक प्रशासन ढिम्म झाले आहे. नेमका किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती लोक सध्या आजारी आहेत याबाबात प्रशानाकडे कुठलीही माहिती नाही. Covishield चा दुसरा डोस 4 आठवड्यात घेण्याची परवानगी द्या; कोर्टाचा आदेश जेव्हा घडणाऱ्या या सर्व प्रकारांबाबत जिल्हाधिकारी आलोक तिवारी यांना विचारले असता तर त्यांनी यावर बोलणं टाळलं आहे. आणि कोणतेही उत्तर न देता निघून गेले. आधीच कोरोनामुळे जनता बेहाल असताना आता डेंग्यूंचा कहर वाढल्याने नागरिक भितीत जगत आहेत. काहींनी तर गावही सोडलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरीही आता डेंग्यूमुळे लोक त्रस्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याने हा कम्यूनिटी स्प्रेड ठरू नये, अशी भिती लोकांना आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Serious diseases, Uttar pradesh

    पुढील बातम्या