लखनौ, 10 एप्रिल : लोकसभेच्या मतदानाची धामधूम उद्या म्हणजे 11 एप्रिलपासून सुरू होते आहे. ही निवडणूक आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांपैकी हायटेक मानली जातेय. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या युक्त्त्या शोधून काढत आहेत.
रणवीर सिंग च्या गली बॉय चित्रपटाचा फिव्हर अजूनही तरुणांमध्ये आहे. याच मूडचा फायदा उठवत भाजपने तरुणांचे काही व्हिडिओ रिलीज केले आहेत. हे तरुण रॅप स्टाइलमध्ये भाजपचा प्रचार करत त्या तालावर गाताना या व्हिडिओमध्ये दिसतात.
As a first time voter, I’m aware of the power of my vote and the strength it can lend to PM Modi’s mission to build a New India. I pledge to make my first vote count by voting for the one, one and only one who has got things done. #MyFirstVoteForModi
— Chowkidar Dr Dinesh Sharma BJP (@drdineshbjp) April 9, 2019
'माय फर्स्ट व्होट फॉर मोदी' या नावाने हा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. उत्तर प्रदेशचे उपमुख्यनमंत्री दिनेश शर्मा यांनी हा व्हिडिओ शेअर केला. पण सोशल मीडियावर प्रचार करताना त्यांचं प्लॅनिंग फसलं आणि त्यामुळे ट्विटरवर त्यांची एकच खिल्ली उडवण्यात आली.
'फर्स्ट टाइम व्होटर' या नात्याने माझ्या मताची शक्ती मला माहीत आहे आणि मोदींना पाठबळ देण्यासाठी हे मत किती महत्त्वाचं आहे, असं त्यांनी लिहिलं आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे अनेक जणांना अचंबा वाटला. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना आवाहन करताच्या नादात दिनेश शर्मा हेच 'फर्स्ट टाइम व्होटर' कधी झाले हे त्यांना कळलंच नाही.
मग केली सारवासारव
यावर सारवासारव करण्यासाठी त्यांनी लिहिलं, माझं पहिलं मत म्हणजे मोदींसाठी दिलेलं पहिलं मत ठरेल, असं मला म्हणायचं होतं. पण तरीही या ट्वीट वरून दिनेश शर्मा यांची जोरदार खिल्ली उडवण्यात आली.
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले दिनेश शर्मा हे लखनौचे 10 वर्षं महापौर होते. अलीकडेच त्यांनी लखनौची जागा जिंकणं हे राजनाथ सिंह यांच्यासाठी 'केकवॉक' आहे, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचीही बरीच चर्चा झाली आणि त्यांचं 'फर्स्ट टाइम व्होटर' हे ट्वीट वेगळ्या कारणांनी गाजतं आहे.
========================================================================================================================================================
VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी