मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिराच्या मदतीनं Boyfriend चा केला गेम ओव्हर, मृतदेहाच्या 12 तुकड्यांची अशी लावली विल्हेवाट

दिराच्या मदतीनं Boyfriend चा केला गेम ओव्हर, मृतदेहाच्या 12 तुकड्यांची अशी लावली विल्हेवाट

एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका महिलेनं आपल्या दिराच्या मदतीनं बॉयफ्रेंडची (Boyfriend) हत्या केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

उत्तर प्रदेश, 20 डिसेंबर: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki)जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका महिलेनं आपल्या दिराच्या मदतीनं बॉयफ्रेंडची (Boyfriend) हत्या केली आहे. त्याचवेळी ही घृणास्पद कृत्य केल्यानंतर आरोपी दीर आणि वहिनीनं मिळून मृत बॉयफ्रेंडचे 12 तुकडे घाघरा नदीत फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी खळबळजनक घटनेचा खुलासा करत आरोपी वहिनी आणि दिराला अटक करून तुरुंगात पाठवलं आहे.

हे प्रकरण बाराबंकी जिल्ह्यातील रामनगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लवकुश हा गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होता. अशा स्थितीत पत्नीनं आपल्या पतीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे मागणी केली. त्याचवेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लवकुशचे अमोली काला येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. गेल्या अनेक दिवसांपासून महिलेचा पती तुरुंगात असल्यानं महिलेच्या दिराला हा प्रकार कळताच दिर भलताच चिडला. अशा स्थितीत त्याने लवकुशला मारण्याचा कट रचला.

आरोपी दिरानं बनवला हत्येचा कट

त्याचवेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी महिलेच्या दिरानं सांगितले की, वहिनीला आपल्या बाजूने करुन घेण्यानं त्याने लवकुशला घरी बोलावून धारदार शस्त्राने वार केले. यासोबतच आरोपींनी मृत लवकुशचा मृतदेह घाघरा नदीत फेकून दिला.

हेही वाचा- भारताची चिंता वाढवणारी बातमी, पाकिस्ताननं सुरु केल्या नव्या कुरापती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी रोजी लवकुश महिलेला भेटण्यासाठी घरी आला असता त्याची हत्या करण्यात आली. यानंतर आरोपी दिरानं आपल्या वहिनीला तिच्या माहेरी पाठवलं. त्यानंतर दिरानं मृत लवकुशचे 12 तुकडे रामनगर येथून बांका येथे नेले आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे गोणीत भरून घाघरा नदीत फेकून दिले.

निगराणी पथकाच्या मदतीनं घटना उघडकीस

याप्रकरणी पोलीस पथकानं पाळत ठेवत या घटनेचा खुलासा केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. त्याचवेळी या प्रकरणी रामनगर डीएसपीने सांगितले की, मृत लवकुश जैस्वाल हा भैरमपूरजवळील अमोली काला येथे ठेक्याशेजारी अंड्याचे दुकान चालवत असे. अमोली कलेतील एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते. आरोपी महिलेचा पती फेब्रुवारी महिन्यात एका गुन्ह्याखाली तुरुंगात गेला होता. यादरम्यान लवकुशचे महिलेसोबत अनैतिक संबंध होते.

हेही वाचा- पिच वाचवण्यासाठी खेळाडूंनी केलं असं काही... VIDEO पाहून वाटेल अभिमान

पुढे त्यांनी सांगितलं की, जेव्हा दिराला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी लवकुशला प्लान अंतर्गत घरी बोलावून त्याची हत्या केली. सध्या दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

First published:

Tags: Crime news, Uttar pradesh