Home /News /national /

सासरच्यांकडून बुलेट न मिळाल्यानं नाराज पतीनं पत्नीला 6 दिवस ठेवलं डांबून, बेल्टनं केली जबर मारहाण

सासरच्यांकडून बुलेट न मिळाल्यानं नाराज पतीनं पत्नीला 6 दिवस ठेवलं डांबून, बेल्टनं केली जबर मारहाण

UP Crime News: उत्तर प्रदेशमधील कौशांबीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हैवान पतीनं आपल्या पत्नीसोबत सर्वात वाईट कृत्य केलं आहे.

    उत्तर प्रदेश, 12 जुलै: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कौशांबीमध्ये (Kaushambi News)एक धक्कादायक (UP Crime) घटना घडली आहे. सासरच्यांकडून बुलेट (Bullet Bike)न मिळाल्यानं नाराज झालेल्या पतीनं आपल्या पत्नी 6 दिवस डांबून ठेऊन तिला जबर मारहाण केली. पीडित महिला कशीबशी हैवान पतीच्या तावडीनं सुटली आणि पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) जाऊन घडलेला प्रकार सांगितला. काही दिवसांपूर्वी माझ्या पतीनं माहेरच्यांकडून बुलेट आणण्यास सांगितलं होतं. मात्र त्याला बुलेट न मिळाल्यानं पती नाराज झाला आणि त्यानं मला आठवड्याभर बांधून ठेवलं होतं. तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्यांनी बेल्टनं मला जबर मारहाण केल्याचं या पीडित महिलेनं पोलिसांना सांगितलं. कौशांबी येथील सराय अकील पोलीस स्टेशन परिसरातील डहिया गावात ही महिला आपल्या पतीसोबत राहते. राज कुमार असं आरोपी पतीचं नाव आहे. राज कुमार याची पत्नी रिनानं त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. चार वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. त्यांना दोन वर्षांचा मुलगा देखील आहे. हेही वाचा- BJPला राजीनाम्याचा झटका;आणखीन 77 पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम, पंकजा घेणार बैठक रिनानं सांगितलं की, राज कुमार मुंबईमध्ये प्रायव्हेट नोकरी करत होता. लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली. त्यामुळे तो घरी परतला. गेल्या काही महिन्यांपासून तो मला माहेरच्यांकडून बुलेट देण्याची मागणी करु लागला. रिनाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांनी जावयाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही राजकुमारनं रिनानं छळवणूक केली. मारहाण करत 6 दिवस ठेवलं ओलिस बुलेट न मिळाल्यानं राजकुमार खूप नाराज होता. 6 जुलैच्या रात्री भांडी धुवत असताना राजकुमारनं बुलेटवरुन वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनं रिनाला ओलिस ठेवलं आणि बंदूकची बट, बेल्टनं मारहाण केली. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीनं रिनाला तब्बल 6 दिवस बांधून ठेवलं आणि तिला रोज जबर मारहाण करत होता. हेही वाचा- लवकरच राज्यावर पाणीसंकट? राज्यातील मोठी धरणं रिकामी होण्याच्या मार्गावर रविवारी रिना त्याच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांना जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडित महिलेच्या शरीरावर मारहाणीचे निशाण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच जखमांच्या आधारावर महिलेची मेडिकल केली जाणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. या महिलेनं दीर प्रवीण कुमार आणि भावजय सविता यांनीही पतीला मदत केल्याचा आरोप केला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime, Crime news, Uttar pradesh, Woman

    पुढील बातम्या