Home /News /national /

'गँग्स ऑफ वासेपुर' सिनेमातील दृश्याचा Live प्रत्यय, घरात घुसून बेछूट गोळीबार- See Video

'गँग्स ऑफ वासेपुर' सिनेमातील दृश्याचा Live प्रत्यय, घरात घुसून बेछूट गोळीबार- See Video

खुलेआम (open firing incident) गोळीबाराची घटना घडली आहे. जुन्या वैमनस्यातून येथे गोळ्या झाडण्यात आल्या.

    उत्तर प्रदेश, 18 डिसेंबर: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) चंदौली जिल्हा (Chandauli District) शुक्रवारी गोळीबाराच्या आवाजानं हादरला. मुख्यालय स्थित असलेल्या चंदौली कोटमध्ये खुलेआम (open firing incident) गोळीबाराची घटना घडली आहे. जुन्या वैमनस्यातून येथे गोळ्या झाडण्यात आल्या. या लाईव्ह गोळीबाराचं दृश्य पाहून चंदौली कोटच्या आसपास राहणारे लोक भलतेच घाबरले. पीडितेच्या बाजूनं कोतवाली पोलीस स्टेशनमधील पोलिसांना यासंदर्भातली माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी जखमींना पोलीस ठाण्यात आणलं. पीडित पक्षाच्या तक्रारीवरून सध्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये बाईकवरून आलेले 2 तरुण कसे अंदाधुंद गोळीबार करत आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. हेही वाचा-  तुम्ही यांना ओळखता का? विनोद कांबळीनं शेअर केला मित्रांसोबतचा जुना फोटो पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, चंदौली कोट येथील रहिवासी नामवर सिंह हा त्याचा धाकटा भाऊ केदारनाथ सिंह याच्याशी घरी बोलत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास तुंगनाथ सिंह आपल्या मुलांसह त्यांच्या घरात घुसले आणि त्यांच्यावर लाठी-काठीनं हल्ला केला. दरम्यान त्यांची मुले अखिलेश सिंह आणि ज्ञानेंद्र सिंह यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी गोळीबार सुरू केला. हे पाहून दोन्ही भावांनी कसेबसे घराच्या आत धाव घेत आपला जीव वाचवला. दिवसाढवळ्या गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ सुमारे 10 ते 15 राऊंड गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. यावेळी रस्त्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी घरात लपून आपला जीव वाचवला. अचानक घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या नामवर सिंह आणि केदारनाथ सिंह यांनी पोलिसांना बोलावलं. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी नामवर सिंह आणि केदारनाथ सिंह यांना त्यांच्या संरक्षणात पोलीस ठाण्यात आणलं. या हल्ल्यात केदारनाथच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पीडित नामवर सिंह यांनी तुंगनाथ सिंह आणि त्यांची मुले अखिलेश सिंह, ज्ञानेंद्र सिंह, अंबरिश सिंह, सत्यम सिंह, दिलीप सिंह यांच्याविरुद्ध सदर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध लाठ्या-काठ्यानं वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची तक्रार दाखल केली आहे. हेही वाचा- Good News...पुन्हा एकदा अदार पूनावाला यांचा विजय, Tweet करुन दिली माहिती या संदर्भात सीओ सदर यांनी सांगितले की, या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. कोणत्या शस्त्रानं गोळीबार करण्यात आला याचाही तपास केला जाईल. परवानाधारक शस्त्रांनी गोळीबार केला असेल, तर नि:शस्त्रीकरणाचीही कारवाई केली जाईल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Uttar pradesh news

    पुढील बातम्या