मराठी बातम्या /बातम्या /देश /

12 लाखांचा दरोडा टाकणारा 'भूत' अटकेत; टोळी पोलिसांच्या ताब्यात; झाला धक्कादायक खुलासा

12 लाखांचा दरोडा टाकणारा 'भूत' अटकेत; टोळी पोलिसांच्या ताब्यात; झाला धक्कादायक खुलासा

बऱ्याच प्रयत्नांनंतर दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले आणि चौकशी सुरू केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

बऱ्याच प्रयत्नांनंतर दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले आणि चौकशी सुरू केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

बऱ्याच प्रयत्नांनंतर दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले आणि चौकशी सुरू केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

  • Published by:  Pooja Vichare
उत्तर प्रदेश, 05 डिसेंबर: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 7 नोव्हेंबर रोजी बरेली येथे दरोडा (Robbery) पडला होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले आणि चौकशी सुरू केली असता धक्कादायक माहिती समोर आली. भूत (Bhoot)आणि त्याच्या टोळीने हा दरोडा टाकला. आता पोलिसांनी भूत आणि त्याच्या टोळीला अटक केली आहे. 7 नोव्हेंबर रोजी बरेली येथील नबाबगंज येथे व्यापारी जलीस अहमद पत्नी आणि मुलांसह घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते. त्याच वेळी, सुमारे डझनभर मुखवटाधारी हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर छापा टाकला आणि संपूर्ण कुटुंबाला शस्त्रांच्या जोरावर ओलिस बनवलं. त्यानंतर रोख आणि दागिन्यांसह सुमारे 12 लाखांचा ऐवज लुटला होता. भूत टोळीनं टाकला होता दरोडा SSP रोहित सजवान यांनी सांगितलं की, अनेक पथके स्थापन करून दरोडेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्न केले. याचदरम्यान, मित्र आणि टोळीतील सदस्यांमध्ये भूत नावाने प्रसिद्ध असलेल्या फरहानच्या टोळीनेच हा दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हेही वाचा- लाजिरवाणी घटना, ठाण्यात 27 वर्षांच्या जावयाकडून 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार घटनेला 25 दिवसा झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा खुलासा करताना भूत टोळीच्या 10 दरोडेखोरांना अटक केली आहे. तर दोन चोरटे अद्याप फरार आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून पाच पिस्तुलांसह व्यापाऱ्याच्या घरातून लुटलेले दागिने आणि अडीच लाखांच्या रोख रक्कम जप्त केली आहे. भूत नावाने फरहान प्रसिद्ध होण्याची कहाणी काही कमी मनोरंजक नाही. फरहान रात्रभर भटकंती करायचा आणि दिवसा घोडे विकून झोपायचा. बरेलीतील सुभाषनगर येथे राहणारा फरहान हा या टोळीचा म्होरक्या आहे. म्हणूनच फरहानला भूत म्हणतात चौकशीदरम्यान, त्याच्या साथीदारांनी पोलिसांना सांगितले की लोक त्याला भूत का म्हणतात. फरहान दिवसा झोपतो आणि रात्रभर हिंडतो. यामुळे नातेवाईक आणि मित्र त्याला भूत म्हणू लागले. त्यामुळे असं झालं की हळूहळू संपूर्ण परिसर त्याला फरहान ऐवजी भूत नावाने हाक मारू लागला. यानंतर जेव्हा तो गुन्हेगारीच्या जगात आला तेव्हा त्याच्या टोळीचे नावही भूत गँग झालं. भूत नावाच्या भीतीनं छोट्या टोळ्या समोर येण्याचे धाडस जमवत नाहीत. हेही वाचा- नागालँडमध्ये हंगामा, गोळीबारात 13 जणांचा मृत्यू; SIT करणार चौकशी  या टोळीला अटक करणाऱ्या टीमचे प्रभारी एसपी राजकुमार अग्रवाल यांनी सांगितलं की, अटक केलेल्या फरहान उर्फ ​​भूत, मनजीत, इर्शाद अहमद उर्फ ​​भुरा उर्फ ​​इशरार, इस्तकार उर्फ ​​गंठा, आमिर, राजू खान, दानिश, अकील खाँ उर्फ ​​कल्लू उर्फ ​​कलवा, संजीव उर्फ ​​गुड्डू, रोज वारसी उर्फ ​​रोज उर्फ ​​शाहबाज खान उर्फ ​​बिहारी अशी नावे आहेत. त्याचवेळी मुसाहिद उर्फ ​​अजय, रुस्तम अशी त्याच्या फरार साथीदारांची नावे आहेत. भूत टोळीची ही पहिलीच घटना आहे असे नाही. या सर्वांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या भूताची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
First published:

Tags: Crime news, Robbery, Uttar pradesh news

पुढील बातम्या