Home /News /national /

45 दिवसांपूर्वी लग्न, नववधूनं Video Call करुन कापली हाताची नस; पतीनंही संपवलं जीवन

45 दिवसांपूर्वी लग्न, नववधूनं Video Call करुन कापली हाताची नस; पतीनंही संपवलं जीवन

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून लोकांचा संयम सुटत चालला असून खून (Murder) आणि आत्महत्यासारख्या (Suicide)घटना घडत आहेत. लखनऊमध्येही (Lucknow) असाच एक प्रकार घडला आहे.

    उत्तर प्रदेश, 16 जानेवारी: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून लोकांचा संयम सुटत चालला असून खून (Murder) आणि आत्महत्यासारख्या (Suicide)घटना घडत आहेत. लखनऊमध्येही (Lucknow) असाच एक प्रकार घडला आहे. जिथे हाताची नस कापून पत्नीनं पतीला व्हिडिओ कॉल केला, तर पतीने गळफास घेऊन (committed suicide) आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे 45 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं आणि फोनवर वाद झाला असता पत्नीनं हाताची नस कापून पतीला व्हिडिओ कॉल (Video Call) केला, त्यानंतर पतीनं आत्महत्या करुन आपलं संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी लखनऊमधील परसादी खेडा, पारा येथे राहणाऱ्या विवेक प्रसादचे लग्न 29 नोव्हेंबर रोजी डुडा कॉलनीत राहणाऱ्या रितूसोबत झालं होतं. विवेकचे वडील गोकर्ण यांनी सांगितलं की, तो शुक्रवारी सकाळी ड्युटीवर गेला होता आणि त्यांची (गोकर्ण यांची पत्नी) पत्नी संगीता घरी होती. संगीता गच्चीवर बसल्या होत्या. 2 जानेवारी रोजी सून रितू तिच्या मामाच्या घरी गेली होती आणि तेव्हापासून ती तिथेच होती. सावधान! अ‍ॅप डाऊनलोड करताच बँक खातं झालं रिकामं; औरंगाबादेत सेवानिवृत्त फौजदाराला 10 लाखांचा गंडा त्यांनी सांगितलं की, रितूने शुक्रवारी दुपारी विवेकला फोन केला होता आणि त्यावेळी दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. यानंतर रितूने ब्लेडने तिच्या हाताची नस कापली आणि विवेकला व्हिडिओ कॉल केला. दुसरीकडे व्हिडीओ कॉलवर पत्नीची अवस्था पाहून विवेक अस्वस्थ झाला आणि आपल्या खोलीत गेला. जिथे त्याने गळफास लावून आपलं जीवन संपवलं. आईनं छतावरून खाली येऊन विवेकचा मृतदेह पाहिला विवेकनं गळफास लावून जीव दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. विवेकची आई गच्चीवरून खाली आल्यावर घरच्यांना हा प्रकार कळला. त्यांना खोलीत मुलगा लटकलेला अवस्थेत दिसला आणि त्यानंतर त्यांनी लोकांना बोलावलं. नातेवाईकांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विवेकचा मृतदेह खाली उतरवून लोकबंधू रुग्णालयात नेला. मात्र डॉक्टरांनी विवेकला रुग्णालयात मृत घोषित केलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uttar pradesh news

    पुढील बातम्या