मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! सेकंडहँण्ड कार खरेदी करण्यासाठी आई-बापानं नवजात अर्भकाला विकलं

धक्कादायक! सेकंडहँण्ड कार खरेदी करण्यासाठी आई-बापानं नवजात अर्भकाला विकलं

कार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून एखाद्या आईबापानी किती निर्दयी व्हावं? त्यांनी चक्क स्वतःच्या पोटच्या पोराचा सौदा करावा...

कार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून एखाद्या आईबापानी किती निर्दयी व्हावं? त्यांनी चक्क स्वतःच्या पोटच्या पोराचा सौदा करावा...

कार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून एखाद्या आईबापानी किती निर्दयी व्हावं? त्यांनी चक्क स्वतःच्या पोटच्या पोराचा सौदा करावा...

  • Published by:  News18 Desk

कन्नौज, 14 मे : एका जोडप्याने आपल्या तीन महिन्याच्या अर्भकाला एका व्यावसायिकाला विकलं. मात्र, असे करण्याचं कारण समजल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.  कार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून एखाद्या आईबापानी किती निर्दय व्हावं? त्यांनी चक्क स्वतःच्या पोटच्या पोराचा सौदा करावा, का तर कार घ्यायला पैसे उभे करायचे म्हणून. अगदी जनावरांमध्येही इतकं आटलेलं प्रेम दिसणार नाही. सेकंड हॅण्ड कार (Second hand car) खरेदी करण्यासाठी सख्ख्या आई-वडिलांनी स्वतःच्याच मुलाला दीड लाख रुपयांना विकले. ही घटना काल्पनिक नाही, खरी आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कन्नौज जिल्ह्यात हे घडलं आहे.

सेकंड हॅण्ड कार (Second hand car) खरेदी करण्यासाठी सख्ख्या आई-वडिलांनी स्वतःच्याच मुलाला दीड लाख रुपयांना विकले. तिरुवा कोतवाली पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. गुरुवारी बाळाच्या आईच्या आई-वडिलांनी (अर्भकाचे आजी-आजोबा) पोलिसांकडे जाऊन मुलाच्या पालकांविरोधात तक्रार दिली.

हे वाचा - ‘बेरोजगार राहीन पण अश्लील दृश्य करणार नाही’; टीव्ही अभिनेत्रीनं दिला अल्ट बालाजीला नकार

उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात एका जोडप्याने आपला नवजात मुलगा एका व्यावसायिकाला विकला. चक्क सेकंड हॅण्ड कार खरेदी करण्यासाठी दीड लाख रुपयांना त्यांनी स्वतःच्या मुलाचा सौदा केला. तिरुवा कोतवाली पोलीस ठाणे परिसरात गुरुवारी मुलाच्या आजी-आजोबांनी पोलिसांकडे जाऊन पालकांविरोधात तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

केवळ दीड लाखांसाठी केला मुलाचा सौदा

पोलिसांनी सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी सातूरच्या दुलारी देवीला (नाव बदललेले) मुलगा झाला होता. पोलीस निरीक्षक शैलेंद्र कुमार मिश्रा म्हणाले, अर्भकाच्या आजी-आजोबांनी स्वतःची मुलगी आणि जावई यांच्यावर हे भयंकर कृत्य केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मुलीने आणि जावयाने कार खरेदी करण्यासाठी मुलाला गुरसैगंज येथील एका व्यावसायिकाला विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दीड लाख मिश्रा म्हणाले, ‘मूल अद्याप व्यावसायिकाच्या ताब्यात असून आम्ही त्या महिलेला व तिच्या पतीला चौकशीसाठी बोलावले आहे,’ असे मिश्रा म्हणाले.

हे वाचा - कोरोना काळात क्रेडिट कार्डवर लोन घेणं टाळा, हे आहे कारण; पाहा लोनसाठीचे इतर पर्याय

नवजात मुलाची विक्री केल्यानंतर कारची खरेदी

तिरुवा कोतवाली पोलीस ठाणे परिसरात गुरुवारी मुलाच्या आजी-आजोबांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलाच्या पालकांविरोधात तक्रार दिली. नवजात मुलाला विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून या जोडप्याने जुनी कारदेखील खरेदी केली होती. यानंतर त्या दोघांनीही आठ दिवस कोणालाही याचा पत्ता लागू दिला नव्हता.

First published:

Tags: Crime news, Kanpur, Uttar pradesh news