Home /News /national /

8 महिन्यांच्या चिमुकल्याला सोडून दाम्पत्याची आत्महत्या, Whatsapp पाठवलेल्या मेसेजनं कोळजाचा ठोका चुकला

8 महिन्यांच्या चिमुकल्याला सोडून दाम्पत्याची आत्महत्या, Whatsapp पाठवलेल्या मेसेजनं कोळजाचा ठोका चुकला

निखिल कुमार आणि पल्लवी भूषण आपल्या लहान बाळासोबत घरात राहात होते.

    गाझियाबाद, 27 जून : चिमुकल्या जीवाला घरी सोडून दाम्पत्यानं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे समोर आली आहे. ज्ञानखंद-1 प्लॅटमध्ये राहणाऱ्या सेल्स मॅनेजरनं पत्नीसोबत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्याच्या पत्नीनं आपल्या बहिणीला Whatsapp मेसेज केला होता. पोलीस तपासातून धक्कादायक बाब समोर आली आहे. आम्ही जात आहोत, 6 वाजता तू बाळाला घ्यायला ये असा मेसेज पत्नीनं आपल्या बहिणीला केला होता. घटनास्थळी पोलीस ज्या वेळी दाखल झाले तेव्हा आईच्या 8 महिन्यांचा चिमुकला आईच्या मृतदेहाजवळ रडत होता. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या हातावर चाकूच्या खुणा होत्या. हे वाचा-ज्या लेकराला जन्म दिला त्याचा डोळ्यांदेखत पाहिला मृत्यू, दौंडमधला भीषण अपघात निखिल कुमार आणि पल्लवी भूषण आपल्या लहान बाळासोबत घरात राहात होते. पल्लवीने पहाचे साडेतीन वाजता आपल्या बहिणीला शेवटचा मेसेज केला. त्यानंतर बहिणीनं पल्लवीला फोन केला. फोन उचलत नसल्यानं तिथे आपल्या मैत्रिणीला पल्लवीच्या घरी जाण्यास सांगितलं. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पल्लवी आणि तिच्या पतीचा मृतदेह दिसला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus disease, Coronavirus symptoms, Coronavirus update, Uttar pradesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या