कोरोनाचं कारण सांगून अधिकाऱ्यानं घरी जाणं टाळलं, पत्नीनं प्लॅटवर प्रेयसीसोबत पकडलं

कोरोनाचं कारण सांगून अधिकाऱ्यानं घरी जाणं टाळलं, पत्नीनं प्लॅटवर प्रेयसीसोबत पकडलं

अधिकाऱ्याचं भांड फुटल्यानं त्यानं पत्नीला मारहाण केल्याचा आरोप पीडित पत्नीनं केला आहे.

  • Share this:

गाझियाबाद, 11 सप्टेंबर: अनेक दिवस कोरोनाचं कारण सांगून एक अधिकारी आपल्या घरी जाणं टाळत असल्याचं त्याच्या पत्नीला लक्षात आलं आणि त्यानंतर संशय अधिक बळावला. याच दरम्यान पत्नीला अधिकारी असलेल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याची टीप मिळाली आणि पत्नी थेट नोएडाहून गाझियाबादला पोहोचली.

उत्तर प्रदेशातील मुरादाबद इथे तैनात असलेले अधिकारी कोरोनाचं कारण देऊन घरी जाणं टाळत होते. स्वत:ला क्वारंटाइन केल्याचं त्यांनी आपल्या पत्नीला निरोप दिला. हा अधिकारी मात्र आपल्या प्रेयसीसोबत गाझियाबादच्या राजनगर परिसरात एका प्लॅटवर राहात होता. पत्नीला यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तिचा राग अनावर झाला.

चिडलेल्या महिलेनं थेट गाझियाबादमध्ये राजनगर इथे पोहोचली. या महिलेनं पत्नीला प्रेयसीसोबत प्लॅटमध्ये पकडल्यानंतर अधिकाऱ्यानं पत्नीला बेदम मारहाण केल्यानं परिसरात मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणाची महिलेनं ट्वीट करून DGP आणि राज्यपालांना तक्रार दाखल केली आहे.

हे वाचा-झूमवर क्लास सुरू असतानाच तरुणीच्या घरात घुसले चोर, लॅपटॉप बंद केला आणि...,

पीडित महिलेनं सांगितलं की आठवड्यातून दोन वेळा नोएडा इथल्या घरी येत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी घरी येणंही बंद केलं होतं. त्यांना कारण विचारल्यावर कोरोना असल्यानं होम क्वारंटाइन असल्याचा खोटा दावा केला. याचा छडा लावण्यासाठी जेव्हा पीडित पत्नी घटनास्थळी पोहोचली तेव्हा सत्य काही वेगळच होतं. अधिकाऱ्याचं भांडं फुटल्यानं त्यानं पत्नीला मारहाण केल्याचा आरोप पीडित पत्नीनं केला आहे.

हिंदुस्तान समाचारनं दिलेल्या वृत्तानुसार हा अधिकारी सध्या मुरादाबाद येथे तैनात असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा करत होता. नोएडा येथे घरात दुसऱ्या महिलेसोबत राहात असल्याचा आरोप अधिकाऱ्याच्या पत्नीनं केला. पीडित महिला गुजरातची असून 28 वर्षांपूर्वी या अधिकाऱ्यासोबत विवाह झाला होता. त्यांना 25 वर्षांची मुलगी आणि 20 वर्षांचा मुलगा आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 11, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या