रायबरेली, 19 जून : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यालयात धूम्रपान करण्यास मनाई केली आहे. कार्यालयात अत्यंत शिस्तीनं काम करण्याच्या सूचना दिल्या असतानाही मनमानी कारभार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. रायबरेलीमधील कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांचा मुजोरीपणा उघड करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नाझीर पवन श्रीवास्तव हे वृद्ध शिपायाक़डून आपली कशी सेवा करून घेत आहेत यावर आता चर्चा रंगली आहे. याचे कारणही तसंच आहे. श्रीवास्तव यांनी या वृद्ध शिपायाकडून आपले पाय चेपून घेतले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी कार्यालयात सुरू असलेल्या मनमानी कारभारावर आणि या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
नाझीर पवन कुमार श्रीवास्तव त्यांच्याच कार्यालयात वद्ध शिपाई राम लखन यांच्याकडून बाय चेपून घेत होते. याच वेळी हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद होत असल्याचं त्यांच्या लक्षात येताच तात्काळ उठून कार्यालयाबाहेर निघून गेले. या घटनेवर कोणतेही इतर अधिकारी बोलण्यात तयार नसल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या जिल्हाधिकाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचा-'हा निर्णय आम्ही...' भिंतीवर सुसाईड नोट लिहून पुण्यात दाम्पत्यानं मुलांसह संपवलं
हे वाचा-डोंगराच्या टोकावर उभा राहून मारायला गेला बॅक फ्लिप आणि..., थरकाप उडवणारा VIDEO
संपादन- क्रांती कानेटकर