आज मध्यरात्रीपासून उत्तर प्रदेश बंद; आणखी कोणती राज्य आहेत कडक लॉकडाऊनमध्ये?

आज मध्यरात्रीपासून उत्तर प्रदेश बंद; आणखी कोणती राज्य आहेत कडक लॉकडाऊनमध्ये?

कोरोनाची वाढती संख्या पाहता या राज्यांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे

  • Share this:

लखनऊ, 9 जुलै : कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाऊन शुक्रवारी रात्री 10 ते 13 जुलै रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लागू राहिल.

या कालावधीत आवश्यक सेवा वगळता सर्व काही तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात संक्रमितांची संख्या 31 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 862 लोकांनी प्राण गमावले आहेत. राज्यात कोरोनाच्या तपासणीची व्याप्ती वाढत असल्याने संक्रमित लोकांची संख्याही वाढत आहे.

कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढत्या घटनांनी उत्तर प्रदेशला पुन्हा लॉकडाऊन स्थितीत आणावे लागले आहे. एक दिवसाच्या जनता कर्फ्यूप्रमाणेच यूपीच्या योगी सरकारने अनलॉक -2 दरम्यान तीन दिवस लॉकडाऊन जाहीर केले आहे. मुख्य सचिवांनी शुक्रवारी रात्री दहा वाजेपासून ते 13 जुलै रोजी सकाळी पाच वाजेपर्यंत सर्व कार्यालये, हॉटेल्स  आणि मार्केट व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेश व्यतिरिक्त आणखी अनेक राज्यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लागू केला आहे. यामध्ये बिहार, आसाम, झारंखड आणि बंगालच्या काही जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याशिवाय ओडिशामधील काही भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 9, 2020, 10:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading