Home /News /national /

UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण, भेटणाऱ्या लोकांचीही होणार चाचणी

UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण, भेटणाऱ्या लोकांचीही होणार चाचणी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

    लखनौ, 14 एप्रिल : देशभरात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला असून महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून याबाबत त्यांनी स्वत: ट्विटरवरून माहिती दिली आहे. 'प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर माझी कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. तसंच तज्ञांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची चाचणी करावी आणि काळजी घ्यावी,' असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत केलं आहे. दरम्यान, उत्त्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उत्तर प्रदेशवरील संकट आणखीनच गडद सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यात काल (मंगळवारी) 18 हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यात 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत एकूण संक्रमित होणाऱ्या लोकांची संख्या 7 लाखांवर गेली आहे. तर 9,309 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल लखनऊमध्ये सर्वाधिक 5382 रुग्ण आढळले आहेत. तर अलाहाबादमध्ये 1856, वाराणसीमध्ये 1404 आणि कानपूरमध्ये 1271 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Yogi Aadityanath

    पुढील बातम्या