लखनऊ, 27 नोव्हेंबर : भरधाव कार रस्ता सोडून थेट दुकानात घुसल्यानं मोठा गदारोळ निर्माण झाला. दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर आजूबाजूचे नागरिक देखील या घटनेमुळे संतप्त झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता काळ्या रंगाची भरधाव कार रस्ता सोडून थेट दुकानात घुसली. दुकानाचं नुकसान झाल्यानं संतप्त स्थानिकांनी कार चालकाची थेट कॉलर पकडून त्याला मारहाण करण्यासाठी गाडीबाहेर खेचून काढलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ परिसरात घडली आहे.
कार चालक गाडीबाहेर येताच काही लोकांनी या चालकाला पकडून मारहाण सुरू केली तर काही जणांना त्याला फरफटत नेलं. कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.
संतप्त नागरिकांनी कार चालकाला लाथा-बुक्क्यांनी आणि दांडुक्यानं बेदम मारहाण केली आहे. या संपूर्ण प्रकारात एक तरुणानं कार चालकाला संतप्त लोकांच्या तावडीतून सोडवलं आहे. कारवरील नियंत्रण अचानक सुटल्यानं हा प्रकार घडल्याचं चालकानं सांगितलं आहे. सुदैवानं या घटनेत कोणी जखमी झालं नसल्याची माहिती मिळाली आहे. हा चालक गंभीर अपघातापासून वाचला या चालकाचा जीव वाचला मात्र संपप्त नागरिकांच्या तावडीतून त्यांच्या मारहाणीतून वाचणं मुश्कील झालं. या चालकाला गंभीर दुखापत झाली आहे.