Home /News /national /

Bypoll Results 2020 : उत्तर प्रदेशमध्ये योगींचा करिश्मा कायम, पोटनिवडणुकीत भाजप आघाडीवर

Bypoll Results 2020 : उत्तर प्रदेशमध्ये योगींचा करिश्मा कायम, पोटनिवडणुकीत भाजप आघाडीवर

उत्तर प्रदेशमध्ये 7 जागांसाठी पोटनिवडणूक (Uttar Pradesh Bypoll Results 2020) घेण्यात आली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे.

    उत्तर प्रदेश, 10 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Assembly Elections) मतमोजणी सुरू आहे. एनडीए (NDA) आणि महागठबंधनमध्ये  काँटे की टक्कर सुरू आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा करिश्मा कायम असल्याचा पाहण्यास मिळाला आहे. पोटनिवडणुकीत (Uttar Pradesh Bypoll Results 2020)भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशमध्ये 7 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. 7 पैकी 4 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे.  सपा 1, बीएसपी 1, अपक्ष 1 एका जागेवर आघाडीवर आहे.  उन्नाव बांगरमऊमध्ये भाजप आघाडीवर आहे. देवरिया, बुलंदशहर,  फिरोजाबादमधील टूंडलामध्ये भाजप आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, सात जागांसाठी 88 उमेदवार मैदानात आहे. पोटनिवडणुकीसाठी 53 टक्के मतदान झाले होते. तर दुसरीकडे, मध्य प्रदेशमध्ये 28 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. 28 जागांपैकी 18 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे बहुमतासाठी लागणाऱ्या 116 जागांचा आकडा भाजपने पार केला आहे.  एकूण 125 जागांवर भाजप पोहोचली आहे.  तर काँग्रेसने 8 जागांवर आघाडीवर असून बसपा 2 जागेवर आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशमध्ये मार्च महिन्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले होते. एकाच वेळी 22 आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आणि कोसळले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे समर्थक 22 आमदारांनी काँग्रेसची साथ सोडली होती. ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये दाखल झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये 230 विधानसभा जागा आहे, यात भाजपकडे 107, काँग्रेसकडे 87, बसपा दोन, सपा 1 आणि 4 अपक्ष आहे.  पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दमोह येथून काँग्रेसचे आमदार राहुल लोधी यांनीही काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झाले. मध्य प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 115 बहुमताचा आकडा गाठणे गरजेचं आहे. भाजपला आणखी 8 जागांची गरज आहे. तर काँग्रेसला 28 जागा जिंकाव्या लागणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या