Home /News /national /

धक्कादायक! बोलेरो कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू, बसखालून काढावे लागले मृतदेह

धक्कादायक! बोलेरो कारच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू, बसखालून काढावे लागले मृतदेह

भरधाव कार आणि बसची जोरदार धडक झाली. या धडकेत बस शेतात जाऊन उलटली आणि प्रवासी बसखाली दबले गेल्यानं गुदमरले.

    पीलीभीत (उत्तर प्रदेश), 17 ऑक्टोबर : बोलेरो आणि बसचा भीषण अपघात शनिवारी पहाटे झाला. कार आणि बसची धडक इतकी जबरदस्त होती की या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 32 जण जखमी झाले असून सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रवाशांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भरधाव कार आणि बसची जोरदार धडक झाली. या धडकेत बस शेतात जाऊन उलटली आणि प्रवासी बसखाली दबले गेल्यानं गुदमरले. तर बोलेरो कारमध्ये असलेले प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील पीलीभीत पुरानापूर इथे हा भीषण अपघात झाला आहे. हे वाचा-पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांना कोरोनाची लागण प्रवाशांनी भरलेली बस लखनऊवरून पीलीभीतच्या दिशेन जात असताना समोरून येणाऱ्या बोलेरो कारनं जोरदार धडक दिली. भरधाव कारची धडक इतकी भीषण होती की बस थेट शेतात जाऊन उलटी झाली. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले तर काही प्रवासी बसखाली चिरडले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 32 जण गंभीर जखमी आहेत. या अपघातावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तर जखमींना तातडीने मदत करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या