उत्तरप्रदेशात गोमांस सापडल्याची अफवा, गोळीबारात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

उत्तरप्रदेशात गोमांस सापडल्याची अफवा, गोळीबारात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

ज्या शेतात मांस सापडलं ते गोमांस नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही करण्यात आलं आहे.

  • Share this:

बुलंदशहर, 3 डिसेंबर : उत्तरप्रदेशातल्या बुलंदशहर इथं गोमांस सापडल्याच्या अफवेवरून हिंसाचार उफाळला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ज्या शेतात मांस सापडलं ते गोमांस नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.


बुलंदशहर जवळच्या एका शेतात मांसचे तुकडे सापडले.  गायीची हत्या करून तिचे तुकडे केल्याची अफवा लगेच पसरली त्यामुळं नागरिक संतप्त झाले. त्यांनी ते मांस एका ट्रॅक्टरमध्ये टाकून मुख्य रस्ता जाम केला. संतप्त नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यावेळी पोलिस आणि नागरिकांमध्ये चकमक उडाली.


परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात पोलिस इन्सपेक्टर सुबोध सिंह यांचाच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. घटनेचं गांभीर्य वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.


जे मांस सापडलं ते गायीचं मांस नव्हतं आणि गायीची हत्याही करण्यात आली नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं. लोकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही पोलिसांनी केलंय.

आता परिस्थिती नियंत्रणार असून पोलीस सोशल मीडियावरही लक्ष ठेवून आहेत अशी माहिती पोलिसांनी दिलंय.


पोलीस आणि नागरिकांच्या संघर्षात एका युवकालाही गोळी लागलीय. या युवकावर उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शहरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.  लोकांनी पोलिसांच्या काही गाड्याही जाळल्याने तणावात भर पडली. नंतर अतिरिक्त पोलिस कुमक आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.


 


 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 07:28 PM IST

ताज्या बातम्या