पैजेसाठी लावली शर्यत, भर ट्रॅफिकमध्ये सुसाट पळाल्या म्हशी, पाहा थरारक VIDEO

पैजेसाठी लावली शर्यत, भर ट्रॅफिकमध्ये सुसाट पळाल्या म्हशी, पाहा थरारक VIDEO

वाहतुकीचे नियम डावलून ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. सुदैवानं या शर्यतीत कोणताही मोठा अपघात झाला नाही.

  • Share this:

बागपत, 14 नोव्हेंबर : ऐन वाहतुक कोंडीमध्ये म्हशीची बग्गी रेसच्या नावाखाली चालवली असल्याचा दावा केला जात आहे. वाहतूक आणि गाड्यांची वर्दळ असताना राष्ट्रीय महामार्गावर बैलगाडीला म्हैस जुंपून ती गाडी सुसाट वेगानं पळवली जात होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये राष्ट्रीय महामार्गावर 709 बी वरील बफेलो कार्ट रेसचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

शुक्रवारी रात्री महामार्गावर रेसच्या नावाखाली बैलगाडीला म्हैस जुंपून त्याची शर्यत लावण्यात आली होती. ट्रॅफिकमध्ये या म्हशींना पळवण्यात आलं. त्यांच्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना दमछान आणि मनस्तापाचा सामना देखील करावा लागला आहे. दरम्यान सट्टेबाजार आणि शर्यतीत जिंकण्यासाठी 5 ते 6 म्हशींना या शर्यतीत पळवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-पतंजली आयुर्वेद देणार रोजगाराची नवी संधी, 5 लाख नोकऱ्या देणार: बाबा रामदेव

दुचाकीस्वारांसोबत या म्हशी त्यांच्या स्पीडनं धावल्याचं दिसत आहे. वाहतुकीचे नियम डावलून ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. सुदैवानं या शर्यतीत कोणताही मोठा अपघात झाला नाही. पोलिसांना या घटनेची कोणतीही माहिती नव्हती व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात असे प्रकार घडत असल्यानं पोलीस प्रशासन काय करत होते असे सावल स्थानिकांनी उपस्थित केले आहेत.

म्हशींच्या शर्यतीच व्हिडीओ कोतवाली परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. दीपावलीच्या पहिल्याच दिवशी रात्री म्हशींची शर्यत लावण्यात आली आणि त्याचा उत्तर प्रदेशातील बागपत इथला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून म्हशींची शर्यत लावणारे फरार आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 14, 2020, 1:42 PM IST

ताज्या बातम्या