ऐकावं ते अजबच! सख्ख्या भाऊ-बहिणीचं जुळलं प्रेम, पळून जाऊन मंदिरात थाटलं लग्न

ऐकावं ते अजबच! सख्ख्या भाऊ-बहिणीचं जुळलं प्रेम, पळून जाऊन मंदिरात थाटलं लग्न

सख्खा भाऊ आणि बहिणीनंच एकमेकांसोबत लग्न थाटल्याचे वृत्त समोर आलं आहे.

  • Share this:

लखनौ, 15 ऑक्टोबर : सख्खा भाऊ आणि बहिणीनंच एकमेकांसोबत लग्न थाटल्याचे वृत्त समोर आलं आहे. तरुणी जेव्हा आपल्या मोठ्या भावासोबत घराकडे परतील तेव्हा तिच्या कपाळावर कुंकू आणि पायामध्ये पैजण पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. भाऊ-बहिणीचा नव विवाहित दाम्पत्यासारखा अवतार पाहून कुटुंबीयांनी त्यांच्या प्रश्नांचा भडीमार केला. यावर दोघांनी एकमेकांसोबतच लग्न केल्याचं सांगताच घरातील मंडळींना जबरदस्त धक्का बसला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मोहम्मदी परिसरातील आहे.

वाचा :ठाण्यात शेफनं 20 वर्षीय तरुणीवर केला बलात्कार, Instagramवर शेअर केला अश्लील फोटो

हे बहीण-भाऊ लखीमपूर खीरी येथील बौधि खुर्द गावातील रहिवासी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या सख्ख्या बहीणभावाचं एकमेकांवरच प्रेम जडलं. यानंतर दोघांनीही लखनौमध्ये पळून जाऊन मंदिरात लग्न थाटलं. हे अजब वृत्त संपूर्ण गावात पसरलं. हे अजब लग्न सध्या गावकऱ्यांमधील चर्चेचा विषय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब अनुसूचित जातीतील आहे. यात हा तरुण तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे.

गावकऱ्यांच्या माहितीनुसार, या तरुणाचे दोन क्रमांकच्या बहिणीसोबत असलेल्या अजब गजब संबंधावरून गावात सुरुवातीपासूनच चर्चा होती. पण हे दोघं असं काही पाऊल उचलतील, याची कोणाला कल्पना नव्हती.

(वाचा : RSS कार्यकर्ता म्हणून नाही तर पैशाच्या कारणांमुळे झाली हत्या, तिहेरी हत्याकांडाला नवं वळण)

VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 04:25 PM IST

ताज्या बातम्या