Home /News /national /

मिरवणूक ठरली शेवटची! घराजवळ मृत्यूनं गाठलं, गॅस कटरनं गाडी कापून काढले 14 मृतदेह

मिरवणूक ठरली शेवटची! घराजवळ मृत्यूनं गाठलं, गॅस कटरनं गाडी कापून काढले 14 मृतदेह

नियंत्रण सुटलं आणि घात झाला, भरधाव बोलेरो आणि ट्रकची भीषण धडक

    प्रतापगड, 20 नोव्हेंबर : वरातीहून घरी निघालेल्या कुटुंबियांवर काळानं घाला घातला. भरधाव बोलेरो आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बोलेरो ट्रकच्या पूर्ण खाली गेली होती. या गाडीचा चुराडा झाला होता. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या भयंकर अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात आतापर्यंत एकूण 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 6 मुलांचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधून हा भीषण अपघात समोर आला आहे. माणिकपूर पोलिस ठाण्यातील देशराज इनारा येथे हा अपघात झाला. रात्री उशिरा मिरवणुकीहून येत असताना भरधाव बोलेरो कारनं ट्रकला भीषण धडक दिली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी 5 मृतदेह बाहेर काढले असून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. हे वाचा-कोरोनाचा पुन्हा उद्रेक, शाळा सुरू करण्याचा निर्णय या राज्याने घेतला मागे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात खूप भीषण होता. बोलेरो कार ट्रकच्या खाली गेली होती आणि चुराडाही झाला होता. त्यामुळे ही कार क्रेनच्या मदतीनं बाहेर काढावी लागली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. चालकाला गाडी चालवताना डोळ्यावर झोप होती आणि अचानक गाडीवरच नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नबाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेखपूर गावात विवाह सोहळ्याला सर्वजण उपस्थित होते. तिथून पुन्हा घरी मिरवणूक संपवून येत असताना काळानं घाला घातला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी ट्रकवर आदळली. या अपघात 6 मुलांसह एकूण 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि गॅस-कटरने बोलेरो कारला कापून मृतदेह बाहेर काढले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या