VIDEO : मास्क न घालण्यावरून झाला वाद, भाजप नेत्यानं पोलिसांना केली मारहाण

VIDEO : मास्क न घालण्यावरून झाला वाद, भाजप नेत्यानं पोलिसांना केली मारहाण

देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे काही राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

  • Share this:

वाराणसी, 04 जुलै: भाजप नेत्यानं आपल्या भावाच्या मदतीनं पोलिसांसोबत हुज्जत घालून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी इथे हा प्रकार घडला. भररस्त्यात रात्री भाजप नेता आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

मास्क न लावण्याच्या कारणावरून झाला वाद

या प्रकरणाची माहिती कळताच उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भाजप नेत्यासह साथीदारांनाही ताब्यात घेतलं. वाराणसीच्या लंका पोलिस स्टेशन परिसरातील सुंदरपूर चौकीची ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क न घालता फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना रोखलं. भाजप जिल्हा पंचायत सदस्य सुरेंद्र पटेल आणि त्यांचे बंधू बिंदू पटेल यांच्यासह इतर काही लोक आली. त्यांनी पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. भांडणाचं रुपांतर हाणामारीपर्यंत गेल्यानं प्रकरण वाढलं.

हे वाचा-'पुणे तिथे काय उणे!' खरेदी केला साडेपाच तोळ्याचा सोन्याचा मास्क, एवढी आहे किंमत

देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. एकीकडे काही राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे सरकार अनलॉक 2.0 च्या माध्यमातून काही प्रमाणात सवलतीही देण्यात येत आहेत. मात्र याचा परिणाम उलट होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा हा 20 हजारांच्या पुढे जात आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 22 हजार 771 नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतचा हा सर्वात जास्त आकडा आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 4, 2020, 10:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading