भाजप नेत्याच्या हत्येनंतर उसळला आगडोंब, पोलीस स्टेशनही पेटवलं

जमाव एवढ्यावरच थांबला नाही तर लोकांनी रोडवस पोलिस स्टेशनमध्ये जावूनही गोधंळही घातला, सामानाची तोडफोड केली, खुर्चा तोडल्या आणि आगही लावली.

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2019 10:07 PM IST

भाजप नेत्याच्या हत्येनंतर उसळला आगडोंब, पोलीस स्टेशनही पेटवलं

लखनऊ 9 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यात बुधवारी भाजपच्या एका नेत्याची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या या घटनेनंतर बस्तीमघ्ये आगडोंब उसळला असून शहरात तणाव निर्माण झालाय. भाजपचे नेते आणि विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कबीर तिवारी यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर तिवारी यांच्या समर्थकांनी शहरात धुडगूस घातला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केलीय. संतप्त जवामाने शहरात अनेक ठिकाणी तोडफोड केली, बसेसला आग लावली. दुकानांचीही तोडफोड केली. जमाव एवढ्यावरच थांबला नाही तर लोकांनी रोडवस पोलिस स्टेशनमध्ये जावूनही गोधंळही घातला, सामानाची तोडफोड केली, खुर्चा तोडल्या आणि आगही लावली.

PM मोदींच्या दौऱ्यांसाठी Air Forceचं नवं विमान, क्षेपणास्त्र हल्लाही परतवणार

त्यामुळे अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी जमावबंदीही लागू केली  आहे. तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलीस त्याच्या कारणांचा शोध घेत आहेत.

देवबंदमध्येही भाजप नेत्याची हत्या

उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये देवबंद भागात भाजपच्या नेत्याची हत्या करण्यात आली. या नेत्याला दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. यशपाल सिंह असं या असं या भाजपच्या नेत्याचं नाव आहे.यशपाल सिंह देवबंदहून मिरगपूरला चालले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांना गोळी घातली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू ओढवला. घटना घडल्याच्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

Loading...

Ambulance उशिरा पोहोचल्याने मुख्यमंत्र्यांच्याच भावाचा झाला मृत्यू

यशपाल सिंह यांना गोळ्या घालणाऱ्या हल्लेखोरांना अजून पकडण्यात आलेलं नाही. यशपाल सिंह हे मिरगपूरचे सरपंच शिवकुमार यांचे मोठे भाऊ आहेत. ते मंगळवारी मानकी रोडहून जात होते. त्याचवेळी त्यांची हत्या करण्यात आली. यशपाल सिंह यांची हत्या नेमकी कशातून झाली, त्यामागे नेमकं काय राजकारण आहे ते कळू शकलेलं नाही.पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 10:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...