बार कौन्सिलच्या महिला अध्यक्षांवर स्वागत सोहळ्यात झाडल्या गोळ्या

बार कौन्सिलच्या महिला अध्यक्षांवर स्वागत सोहळ्यात झाडल्या गोळ्या

बार कौन्सिलच्या नव्या महिला अध्यक्षांसाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या नव्या अध्यक्षांचं थाटात स्वागतही झालं, मिठाई वाटण्यात आली पण या सेलिब्रेशननंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू ओढवला.

  • Share this:

आग्रा, 12 जून : बार कौन्सिलच्या नव्या महिला अध्यक्षांसाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या नव्या अध्यक्षांचं थाटात स्वागतही झालं, मिठाई वाटण्यात आली पण या सेलिब्रेशननंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू ओढवला.

उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या अध्यक्ष दरवेश यादव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरवेश यादव यांना अगदी दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशच्या बार कौन्सिलचं अध्यक्षपद मिळालं होतं.

अध्यक्ष झाल्याबद्दल दरवेश यादव यांचं दिवानी कचेरीमध्ये स्वागत करण्यासाठी जंगी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या स्वागतासाठी वकिलांनी मिरवणूकही काढली. यानंतर दरवेश यादव अधिवक्ता अरविंद मिश्रा यांच्या चेंबरमध्ये आल्या. त्यावेळी अधिवक्ता मनीष शर्मा यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यावर मनीषने दरवेश यांच्यावर रिव्हॉल्वरने गोळ्या झाडल्या.

३ गोळ्या झाडल्याने मृत्यू

अधिवक्ता मनीषने दरवेश यादव यांच्यावर तीन गोळ्या झाडल्यामुळे दरवेश यादव यांचा मृत्यू ओढवला. या झटापटीत मनीष यालाही गोळी लागली. दरवेश यादव यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्या जागीच पडल्या. लगेचच त्यांनी एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण दरवेश यांचा मृत्यू ओढवला. त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मनीषलाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पहिली महिला अध्यक्ष

न्यू आग्रा परिसरात ही खुनाची घटना घडली. नव्याने निवडून आलेल्या बार कौन्सिलच्या अध्यक्षांचा खून झाल्यामुळे आग्रा परिसरात खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी महिलेची निवड झाली होता.पण त्यांचीच हत्या करण्यात आली.दरवेश सिंह या 2012 मध्ये बार कौन्सिलच्या सदस्य झाल्या होत्या. त्यानंतर यावर्षीच्या निवडणुकीत त्या अध्यक्ष झाल्या.

============================================================================

VIDEO : 'वायू' गुजरातच्या वेशीवर,वादळापूर्वीच सोमनाथला मोठा तडाखा!

First published: June 12, 2019, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading