Home /News /national /

भीषण अपघात; लग्नाला जाण्याआधीच कुटुंबावर काळाचा घाला, 6 जण ठार, तिघांची प्रकृती गंभीर

भीषण अपघात; लग्नाला जाण्याआधीच कुटुंबावर काळाचा घाला, 6 जण ठार, तिघांची प्रकृती गंभीर

महिंद्रा बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात भीषण टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    बलरामपूर, 21 मे: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बलरामपूर (Balrampur District) जिल्ह्यात महिंद्रा बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात भीषण टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. त्याचवेळी या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक इतकी जोरदार होती की कारचा चक्काचूर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात बलरामपूरच्या तुलसीपूर पोलीस स्टेशन (Tulsipur Police Station) हद्दीतील गणवारिया (Ganwaria Village) गावाजवळ घडला आहे. बोलेरोमधील सर्व नऊ जण लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान, बलरामपूरच्या तुलसीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गणवारिया गावाजवळ ट्रॅक्टरची ट्रॉलीला धडक बसली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत हे महाराजगंज तराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मणपूर गावचे रहिवासी आहेत. बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीची भीषण धडक झाल्याची माहिती प्रथम स्थानिकांना मिळाली. मात्र ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजेशकुमार सक्सेना यांच्यासह तुळशीपूर, पाचपेडवा आणि जारवा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमींना तुळशीपूर कम्युनिटी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. पुण्यात CNG च्या दरात वाढ, सदाभाऊंची पुन्हा केतकीच्या पोस्टवर टिप्पणी, J&K मध्ये पुन्हा भूस्खलन TOP बातम्या बोलेरोवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावण्यात आला आहे. एवढेच नाही तर महामार्गावरून वाहन हटविण्यासाठी पोलिसांनी जेसीबी मागवले होते. त्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. जखमींची प्रकृती चिंताजनक पोलीस अधीक्षक राजेश कुमार सक्सेना यांनी अपघाताबाबत सांगितलं की, शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास गासडीकडे जाणाऱ्या बोलेरो कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसली. या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याच वेळी चार जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, त्यापैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचबरोबर तीन जखमींची प्रकृती ठीक आहे. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी सहाही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Accident, Uttar pradesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या