Home /News /national /

लग्नाचं आमिष दाखवून उत्तर प्रदेशातल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, नंतर नाशिकमध्ये ओलीस ठेवून बलात्कार

लग्नाचं आमिष दाखवून उत्तर प्रदेशातल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, नंतर नाशिकमध्ये ओलीस ठेवून बलात्कार

उत्तर प्रदेशातील बलिया (Ballia) येथील एका गावातून 15 वर्षीय मुलीचं लग्नाच्या बहाण्याने अपहरण करण्यात आलं. अपहरणानंतर तिला नाशिक (Nashik) महाराष्ट्र येथे ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आला.

    उत्तर प्रदेश, 22 जानेवारी: उत्तर प्रदेशातील बलिया (Ballia) येथील एका गावातून 15 वर्षीय मुलीचं लग्नाच्या बहाण्याने अपहरण करण्यात आलं. अपहरणानंतर तिला नाशिक (Nashik) महाराष्ट्र येथे ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणियार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीचं किशन बिंद नावाच्या 22 वर्षीय तरुणाने 26 डिसेंबर रोजी अपहरण केलं होतं. लग्न करण्याच्या बहाण्यानं त्यानं मुलीला महाराष्ट्रातील नाशिकला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याबाबत नातेवाईकांनी पोलिसांना माहिती देताच ही घटना उघडकीस आली. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई या मुलीचं अपहरण झाल्याप्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रार आल्यानंतरच पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. माहिती देणाऱ्यांचा पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तरुणाला ताब्यात घेतले. यासोबतच आरोपी किशन बिंद याला अटक करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारागृहात रवानगी करण्यात आली. बलात्कारासह पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर कारवाई या घटनेबाबत पोलीस ठाण्याचे प्रभारी मदन पटेल म्हणाले की, मुलीच्या जबाबाच्या आधारे या प्रकरणात बलात्कार आणि पॉक्सो कायद्याची कलमे जोडण्यात आली आहेत. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Nashik, Rape, Uttar pradesh news

    पुढील बातम्या