मराठी बातम्या /बातम्या /देश /

अजबगजब आधुनिक स्वयंवर! आता चौघांमधून कोण होणार या तरुणीचा नवरा, चिठ्ठीतून मिळालं उत्तर

अजबगजब आधुनिक स्वयंवर! आता चौघांमधून कोण होणार या तरुणीचा नवरा, चिठ्ठीतून मिळालं उत्तर

जोडीदार निवडण्याची गोष्ट आयुष्यात अतिशय कळीची असते. इथं मात्र जणू खेळा-खेळात जोडीदार निवडला गेला.

जोडीदार निवडण्याची गोष्ट आयुष्यात अतिशय कळीची असते. इथं मात्र जणू खेळा-खेळात जोडीदार निवडला गेला.

जोडीदार निवडण्याची गोष्ट आयुष्यात अतिशय कळीची असते. इथं मात्र जणू खेळा-खेळात जोडीदार निवडला गेला.

  • Published by:  News18 Desk

अझिमनगर, 4 मार्च : भारतासारख्या देशात कधी काय होईल सांगता येत नाही. एका तरुणीबाबत अशीच एक चित्रविचित्र घटना घडली आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशात अझिमनगर इथं घडलं आहे. चार तरुणांच्या प्रेमात अडकलेल्या एका तरुणीला आपला पती निवडण्यासाठी एक भन्नाट युक्ती लढवावी लागली. (Azimnagar woman marriage news)

झालं असं, की चार तरुणांमध्ये फसलेल्या एका तरुणीला आपला पती निवडण्यासाठी पंचांची मदत घ्यावी लागली. या पंचांनी ही निवड करण्यासाठी चक्क चिठ्ठी टाकण्याची पद्धत निवडली. चार तरुणांनी या तरुणीला पळवून आणलं होतं. (Azimnagar woman marriage be picking paper note)

तरुणीला समजत नव्हतं, की तिनं कुणाला आपला जीवनसाथी म्हणून निवडावं. या प्रकरणात काहीच तोडगा निघत नसल्यानं शेवटी पंचांनी पुढाकार घ्यायचा ठरवला. त्यांनी यासाठी चिठ्ठी टाकायची ठरवली. चारी तरुणांच्या नावाची चिठ्ठी टाकली गेली. (4 men marriage by picking paper note)

हेही वाचा चेहऱ्याची अशी अवस्था नको असेल तर Beauty Treatment पूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

यातून जे नाव निघालं ते तरुणीचा जीवनसाथी म्हणून अंतिम केलं गेलं. विशेष म्हणजे तरुणीनंही याबाबत सहमती दर्शवली. हे प्रकरण अजिमनगर पोलीस स्टेशन आणि टांडा कोतवाली परिसराशी संबंधित आहे. पाच दिवसांपूर्वी अजिमनगर ठाणे क्षेत्रातील चार तरुण कोतवाली टांडा भागातील एका तरुणीला पळवून घेऊन आले. (woman chose life partner with paper note)

आरोपींनी दोन दिवस या तरुणीला आपल्या नातेवाईकांकडे लपवून ठेवलं. मात्र ही गोष्ट उघड झाल्यावर चारी तरुणांचा गुन्हा उघडकीस आला. तरुणीचे नातेवाईक या आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्याची तयारी करू लागले. मात्र काही वृद्ध-अनुभवी लोकांनी समेट घडवण्याचेही प्रयत्न सुरू केले.

हेही वाचा बापरे! भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या कुटुंबाला ठेवलं ओलीस

चिठ्ठीच्या गोष्टीवर दोन्हीकडचे पक्ष तयार झाले. चारी तरुणांची नावं चिठ्ठीवर लिहिल्यानंतर त्याला एका वाटीत ठेवलं गेलं. यादरम्यान पंचांनी एका लहान मुलाला एक चिठ्ठी उचलायला सांगितली. मुलानं चिठ्ठी उचलताच तीन दिवसांपासून सुरू असलेला वाद क्षणात मिटला. तरुणीचं लग्न त्या तरुणासोबत पक्के झालं ज्याचं नाव त्या चिठ्ठीत होतं.

सगळ्या परिसरात आता या अनोख्या विवाहाची चर्चा रंगली आहे. अर्थात, मुलीची बदनामी होईल या कल्पनेनं याविषयी कुणीच जास्त बोलत नाही.

First published:

Tags: Marriage, Uttar pradesh