वारंवार एकच इंजेक्शन वापरल्याने 40 रुग्णांना एचआयव्ही पॉझिटिव्ह!

वारंवार एकच इंजेक्शन वापरल्याने 40 रुग्णांना एचआयव्ही पॉझिटिव्ह!

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगरमऊ या भागातल्या तब्बल 40 लोकांना एचआयव्ही पॉझिटिव्ह झाला आहे.

  • Share this:

06 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगरमऊ या भागातल्या तब्बल 40 लोकांना एचआयव्ही पॉझिटिव्ह झाला आहे. इथल्या स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या गावात एक कॅम्प उभारण्यात आलं होतं. त्यावेळी इथं येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सिरिजनुसार इंजेक्शन देण्यात आलं. त्यामुळेच एक साथ इतक्या लोकांना एचआईव्ही पॉझिटिव्ह झाला असावा अशी बाब समोर आली आहे.

मध्यंतरी या गावात एक स्वास्त शिबिर चालवण्यात आलं होतं. त्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानुसार आता कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बांगरमऊचे काऊन्सलर सुनील यांच्याकडून सांगण्यात आलं की, 'आतापर्यंत 40 रुग्णांना एचआयव्ही झाल्याचं समोर आले आहे. जर यावर अजून तपास केला तर हा आकडा 500 पेक्षा अधिक असेल.' कारण या भागात लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे.

या संपूर्ण प्रकरणात राज्य आरोग्य मंत्री सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, 'याची तपासणी केली जात आहे. जे विना परवाना हा कॅम्प चालवत होते त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 12:39 PM IST

ताज्या बातम्या