मराठी बातम्या /बातम्या /देश /

UP Assembly election Results: ज्या मतदारसंघातून योगी लढले तिथे 45 वर्षांनी घडला एक विक्रम

UP Assembly election Results: ज्या मतदारसंघातून योगी लढले तिथे 45 वर्षांनी घडला एक विक्रम

Uttar Pradesh Assembly Election Result 2022: योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्री होणार आहेत. या मोठ्या राज्यात त्यांनी गोरखपूरमधून निवडणूक लढवली होती. काय आहे या विजयाचं विशेष?

Uttar Pradesh Assembly Election Result 2022: योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्री होणार आहेत. या मोठ्या राज्यात त्यांनी गोरखपूरमधून निवडणूक लढवली होती. काय आहे या विजयाचं विशेष?

Uttar Pradesh Assembly Election Result 2022: योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांना मुख्यमंत्री होणार आहेत. या मोठ्या राज्यात त्यांनी गोरखपूरमधून निवडणूक लढवली होती. काय आहे या विजयाचं विशेष?

लखनौ, 10 मार्च : उत्तर प्रदेशसह (UP Assembly Election Results 2022) एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Vote Counting live at Uttar Pradesh) आज (10 मार्च) सकाळपासून सुरू आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष (BJP) बहुमताच्या दिशेने आगेकूच   सुरुवातीच्या कलांमध्ये दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्या मतदारसंघाच्या बाबतीत एक विक्रम झाल्याचं समोर आलं आहे. 'अमर उजाला'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहरी (Gorakhpur Urban Constituency) मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघात या वेळी 53.30 टक्के मतदान झालं. या मतदारसंघातल्या मतदानाचा (Record Voting) हा गेल्या 45 वर्षांतला उच्चांक आहे. 2017मध्ये या मतदारसंघात 50.98 टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच गेल्या वेळच्या तुलनेत या वेळी मतदानाच्या टक्केवारीत 2.32 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेशच्या (UP) निवडणूक इतिहासातली आणखी एक वेगळी गोष्ट या निवडणुकीत घडली. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवण्याची या वेळी 18 वर्षांनी आली. याआधी 2003 साली मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना निवडणूक लढवली होती. गोरखपूर शहरी मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्याचा नेमका काय परिणाम झाला, त्याचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा झाला, त्याचा राजकीय अर्थ काय, याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. हे वाचा -  उत्पल पर्रीकरांना पराभूत करणारे बाबूश मोन्सेरात भाजपवरच नाराज; सांगितलं कारण राजकीय विश्लेषक प्रा. अजय सिंह म्हणतात, 'मतदानाचा टक्का वाढण्याचे दोन अर्थ असतात. एक तर सरकार किंवा उमेदवाराविरोधात अँटी-इन्कम्बन्सी अर्थात नाराजी. तसंच, एखादा पक्ष किंवा उमेदवाराची लाट असली, तरीही मतदान वाढू शकतं. गोरखपूर शहरी मतदारसंघाच्या बाबतीत दुसरं कारण लागू पडतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक लढवणं हे मतदान वाढण्याचं कारण असू शकतं.' 'गोरखपूरची ओळख आता योगी आदित्यनाथांशी जास्त जोडली गेली आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणं हा योगी आदित्यनाथांसाठी चांगला संकेत असू शकतो,' असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रमोद श्रीवास्तव यांनी व्यक्त केलं. हे वाचा -  UP Election Result 2022: यूपीत भाजपचाच डंका, पण औवैसींच्या AIMIMचं काय झालं? गेल्या 45 वर्षांच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं, तर असं लक्षात येतं, की जेव्हा जेव्हा गोरखपूर शहरी भागात मतदान वाढलं आहे, तेव्हा तेव्हा त्याचा फायदा भाजपलाच मिळाला आहे. मतदान जास्त झाल्यावर भाजपच्या विजयाचं मार्जिनही वाढत जात असल्याचं दिसून आलं आहे. गोरखपूर शहरी मतदारसंघ 1989पासून भारतीय जनता पक्षाकडेच आहे. 2002 साली तिकीटवाटपावरून योगी आदित्यनाथ आणि भाजप नेत्यांमध्ये वाद झाला होता. तेव्हा योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर शहरी मतदारसंघातून अखिल भारतीय हिंदू महासभेच्या (Akhil Bhartiya Hindu Mahasabha) तिकिटावर डॉ. राधामोहन दास अग्रवाल (Dr Radhamohan Das Agrawal) यांनी रिंगणात उतरवलं होतं आणि ते जिंकलेही होते. त्या वर्षी 33.1 मतदान झालं होतं. 2007 पासून डॉ. राधामोहन दास अग्रवाल सलग तीन वेळा भाजपच्या तिकिटावरून निवडून आले. गोरखपूर शहरी मतदारसंघाचा इतिहास 1989, 1991, 1993 आणि 1996 या चार विधानसभा निवडणुकांमध्ये गोरखपूर शहरी मतदारसंघातून भाजपचे शिवप्रताप शुक्ला निवडून आले होते. या वर्षांत अनुक्रमे 49.5%, 43.4%, 47.7% आणि 38 % मतदान या मतदारसंघात झालं होतं.

हे वाचा - 103 गुन्हे दाखल, 2 वर्षांपासून तुरुंगात; तरीही UP च्या निवडणुकीत या उमेदवाराने भाजपला हरवलं!

 2007 साली या मतदारसंघात 28.6 टक्के मतदान झालं होतं. तेव्हा भाजपच्या डॉ. राधामोहन दास अग्रवास यांनी 22,392 मतांनी विजय प्राप्त केला होता. डॉ. अग्रवाल यांना 49,715, तर दुसऱ्या क्रमांकावरच्या भानुप्रकाश मिश्र (सपा) यांना 27,323 मतं मिळाली होती.
2012 साली या मतदारसंघात 46.2 टक्के मतदान झालं. तेव्हा भाजपच्या विजयाच्या मार्जिनमध्येही जवळपास चार टक्के वाढ झाली. तेव्हा डॉ. अग्रवाल यांना 81,148, तर दुसऱ्या क्रमांकावरच्या राजकुमारी देवी (सपा) यांना 33,694 मतं मिळाली होती. 47,454 मतांनी डॉ. अग्रवाल यांचा विजय झाला होता. 2017 साली या मतदारसंघात 50.98 टक्के मतदान झालं. तेव्हा भाजपचे डॉ. अग्रवाल यांना 1,22,221, तर काँग्रेसच्या राणा राहुलसिंह यांना 61,491 मतं मिळाली. डॉ. अग्रवाल 60,730 मतांच्या फरकाने जिंकले होते. 2022मध्ये या मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक लढवली असून, 53.30 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या या ट्रेंडचा योगी आदित्यनाथांना किती फायदा होतो, हे लवकरच कळेल.
First published:

Tags: Assembly Election, Election, Uttar pradesh, Yogi Aadityanath

पुढील बातम्या