चार्टर्ड विमान कोसळून लागली आग, दुर्घटनाग्रस्त विमानात होते 6 प्रवासी

चार्टर्ड विमान कोसळून लागली आग, दुर्घटनाग्रस्त विमानात होते 6 प्रवासी

लँड होत असताना चार्टर्ड विमान कोसळलं आणि त्यानंतर विमानाला आगदेखील लागली.

  • Share this:

लखनौ, 27 ऑगस्ट : दिल्लीहून अलिगडच्या दिशेनं प्रवास करणारं एक चार्टर्ड विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. मंगळवारी (27 ऑगस्ट) सकाळी हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 हजार व्होल्ट तीव्रेतच्या विजांच्या तारांना धडकल्यानं विमानाचा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळेस विमानात एकूण सहा प्रवासी होते. सुदैवानं ते सर्वजण सुखरूप आहेत. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या सर्वांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. धावपट्टीवर उतरत असताना विमानाचा अपघात झाला. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अधिकाऱ्यांसह पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

(वाचा : देवदर्शनानंतर भाविकांवर काळाचा घाला, सोलापुरात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू)

धनीपूर धावपट्टीवर झाला अपघात

ही दुर्घटना गांधी पार्क परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनीपूर धावपट्टीवर लँडिंग होण्यापूर्वी विमान विजांच्या तारांवर धडकलं आणि खाली कोसळलं. कोसळल्यानंतर विमानाला आगदेखील लागली. दुर्घटनाग्रस्त विमान खासगी कंपनीचं होतं. दरम्यान, दुरुस्तीसाठीच इंजिनिअर्स हे विमान दिल्लीहून अलिगडकडे घेऊन येत होते, असं म्हटलं जात आहे.

(वाचा : गायक आनंद शिंदेंच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, थोडक्यात बचावले)

सहा प्रवासी सुखरूप

विमान कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते. सुदैवानं विमानात असलेले दोन वैमानिक आणि चार इंजिनिअर्स सुखरुप बचावले आहेत. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading