Home /News /national /

घरात निघाला 8 फुटांचा अजगर; त्या सापाशी खेळतोय मुलगा, पाहा VIDEO

घरात निघाला 8 फुटांचा अजगर; त्या सापाशी खेळतोय मुलगा, पाहा VIDEO

त्या अजगराला बाहेर काढलं आणि अंगणात ठेवलं होतं. त्याच वेळी घरातला एक 7 वर्षांचा मुलगा पुढे आला आणि तो त्या अजगराशी खेळायला लागला.

    आग्रा 07 जानेवारी : साप म्हटलं की अंगावर पहिलेच काटा येतो. सापाच्या जवळ जाणंही नको असते. कारण सापांविषयी मनात असलेली भीती. साप दोन प्रकारचे असतात असं कायम सांगितलं जातं. विषारी आणि बिनविषारी. त्यांना ओळखण्यासाठीही काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक असतं मात्र त्याबाबत जागृती झालेली नाही. मात्र आग्रा इथल्या एका घटनेने सगळेच थक्क झालेत. एका 7 वर्षांच्या मुलाने घरात निघालेल्या अजगराशी चक्क मैत्री करत तो त्याच्याशी खेळायला लागला. हा मुलगा आणि अजगराचा हा खेळ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाहणारे सगळेच थक्क झाले आहेत. हा मुलगा अजगराशी मैत्री कशी करू शकतो शकतो असा प्रश्न आता विचारला जातोय. आग्र्या जवळच्या निबोहरा या गावात एका घरी हा 8 फुटाचा अजगर आढळून आला. घरातल्या लोकांनी त्या अजगराला बाहेर काढलं आणि अंगणात ठेवलं होतं. त्याच वेळी घरातला एक 7 वर्षांचा मुलगा पुढे आला आणि तो त्या अजगराशी खेळायला लागला. काही लोकांनी त्याचा व्हिडीओ तयार केलाय. हाच व्हिडीओ आता व्हायरल होतोय. ताज महल असलेल्या आग्रा आणि परिसरात अजगर मोठ्या प्रमाणावर आढळतात. हा परिसर अजगरांसाठी ओळखला जातो. इथले लोक हे अजगरांना मारत नाहीत. तर त्यांची सुटका करून त्यांना जंगलात सोडून देतात. गेल्या काही महिन्यांमध्ये या परिसरात अजगर सापडल्याच्या खूप घटना घडल्या आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या