आईच्या शरीराखाली गुदमरून 3 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

बाळाला दूध पाजताना त्याच्या आईला चुकून झोप लागली आणि जन्मभर वेदना देईल अशी घटना या मातेच्या आयुष्यात घडली.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 12:57 PM IST

आईच्या शरीराखाली गुदमरून 3 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

लखनौ, 10 सप्टेंबर : हृदय पिळवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. बाळाला दूध पाजताना त्याच्या आईला चुकून झोप लागली आणि जन्मभर वेदना देईल अशी घटना या मातेच्या आयुष्यात घडली. या महिलेच्याच अंगाखाली गुदमरून तिच्या तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना आग्रा येथील मालौनी गावात घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरिता सिंह असं या महिलेचं नाव आहे. कुशीवर झोपून सरिता आपल्या बाळाला दूध पाजत होती. यादरम्यान काही वेळासाठी तिचा डोळा लागला. या काही वेळात होत्याचं नव्हतं झालं होतं. झोपेतून जाग आली तेव्हा तीन महिन्यांचं आपलं बाळ स्वतःच्याच अंगाखाली दबलं गेल्याचं तिच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

(वाचा : शिवसेना वाहतूक सेनेच्या अध्यक्षाने महिला पदाधिकारीकडे केली शरीर सुखाची मागणी)

कारण आईच्या शरीराखाली दबल्यानं बाळ गुदमरलं होतं. बाळाच्या शरीराच्या काहीच हालचाल होत नसल्याचं कळल्यानंतर सरिता जोरजोरात ओक्साबोक्शी रडू लागली. तिचा आवाज ऐकून कुटुंबीयही घाबरले. काही महिन्यांपूर्वीच घरात आलेला नवा पाहुणा आता आपल्यात नाही, हे समजताच त्यांच्याही पायाखालची जमीन सरकरली. कारण गुदमरून बाळाचा जागीच मृत्यू झाला होता.

(वाचा : पोटच्या दोन मुलांना गळफास देऊन जन्मदात्या आईने केली आत्महत्या)

यानंतर तातडीनं बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषिक केलं. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Loading...

(वाचा : पती घेत होता चारित्र्यावर संशय.. पत्नीचे हात-पाय बांधून चिरला गळा)

VIDEO: काँग्रेस-राष्ट्रवादीला भविष्य नाही; मत वाया घालवू नका, पंकजा मुंडे आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...