उत्तर प्रदेशमध्ये प्रेमाखातर मुलीने मुलगा बनून केला प्रेयसीशी विवाह!

या दोन्ही तरुणींचे कॉलेज जीवनापासून प्रेम संबंध होते. त्यानुसार 16 एप्रिल रोजी एका सामुदायिक विवाह सोहळ्यात दोन्ही तरुणींनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलंय.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 04:30 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये प्रेमाखातर मुलीने मुलगा बनून केला प्रेयसीशी विवाह!

23 एप्रिल : उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एक विचित्र लग्न सोहळा पार पडला. मुलीने मुलगा बनून मुलीशी लग्न केलं आहे. पण कुटुंबियांनी यावर आक्षेप घेतल्यानंतरही दोघींनी विभक्त होण्यास नकार दिला आहे.

या दोन्ही तरुणींचे कॉलेज जीवनापासून प्रेम संबंध होते. त्यानुसार 16 एप्रिल रोजी एका सामुदायिक विवाह सोहळ्यात दोन्ही तरुणींनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलंय. लग्नासाठी या दोघींपैकी एकीने आपलं नाव सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह इच्छूक वर म्हणून नोंदवलं. तर दुसरीने वधू म्हणून.

विशेष म्हणजे, सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजकांना संशय येऊ नये, म्हणून दोघींनी पालकांना भाड्यावर आणलं होतं. लग्नानंतर दोघींनी एकच खोली घेतली, पण दोघीही वेगवेगळ्या राहत होत्या. त्यातच दोघींमधील एक मुलगी अचानक गायब झाल्याने कुटुंबीय हैराण झालं होतं. त्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

या शोध मोहिमेत मुलीच्या कुटुंबियांना जी माहिती मिळाली ती ऐकून त्यांना धक्काच बसला. दोघींपैकी एकीने मुलगा बनून मुलीशीच लग्न केल्याचं कुटुंबियांना समजलं. दरम्यान, पोलिसांनी या दोघींना समजावण्याचा प्रयत्न केला पण आम्हासा वेगळं केलं तर आम्ही जीव देऊ अशी धमकी त्या दोघींनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 08:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...