फारुखाबाद: ओलीस ठेवलेल्या 23 मुलांची सुखरूप सुटका, चकमकीत माथेफिरू ठार

फारुखाबाद: ओलीस ठेवलेल्या 23 मुलांची सुखरूप सुटका, चकमकीत माथेफिरू ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओलीस ठेवण्यात आलेल्या मुलांमध्ये 6 महिन्यांची चिमुकलीही होती.

  • Share this:

फारुखाबाद, 31 जानेवारी : उत्तर प्रदेशातील मोहम्मदाबाद येथील कोतवाली इथे माथेफिरुने डांबून ठेवलेल्या 23 मुलांची 8 तासांनंतर अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी तब्बल 8 तासांच्या ऑपरेशननंतर या मुलांची सुखरुप सुटका केली. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत माथेफिरू जागीच ठार झाला आहे. दरम्यान या मुलांमध्ये 6 महिन्यांच्या मुलीचा समावेश असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चकमकीआधी माथेफिरूनं स्वत: 6 महिन्यांच्या मुलीला पोलिसांच्या हवाली केलं होतं. मात्र बाकी मुलांना त्याने डांबून ठेवलं. जोपर्यंत त्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलांची सुखरुप सुटका करण्यास तो तयार नव्हता.

माथेफिरुनं पोलिसांना घराबाहेर एक चिठ्ठी फेकून आपली मागणी सांगितली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शौचालय आणि घर बांधून न दिल्यानं त्यांने तीव्र नाराजी व्यक्त केली. या योजनांचा लाभ न मिळाल्याबद्दल त्याने सचिव आणि डीएम यासाठी जबाबदार असल्याचा त्याने आरोप केला होता.

नेमकं काय घडलं होतं?

करतिया गावात सुभाष वथम यांनी वाढदिवसाच्या बहाण्याने परिसरातील मुलांना बोलावून ओलीस ठेवलं होतं. त्याची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलांना सोडणार नसल्याचं त्याने सांगितलं. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्लीहून एनएसजीची टीम फर्रुखाबादला पोहोचली होती. 8 तासांच्या चकमकीनंतर अखेर पोलिसांनी या मुलांची सुखरूप सुटका केली आहे. माथेफिरुनं केलेल्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले आहेत. गोळीबारात माथेफिरू ठार झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.

First Published: Jan 31, 2020 06:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading