SHOCKING: मुसळधार पावसात मोठा अपघात, कार तोडून काढावे लागले 9 मृतदेह

SHOCKING: मुसळधार पावसात मोठा अपघात, कार तोडून काढावे लागले 9 मृतदेह

कार आणि कंटेनरची धडक, भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू

  • Share this:

प्रतापगड, 05 जून : मुसळधार पावसानंतर कार आणि कंटेनरची जोरधार धडक झाल्यानं भीषण अपघात झाला. प्रतापगडजवळ नबाबगंज पोलीस ठाणा क्षेत्रातील वाजिदपूर गावाजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 4 तरुण, 3 महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघाताची भीषणता इतकी होती की कारच्या पुढचा भाग कंटेनरच्या बोनेटमध्ये घुसला होता. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. दरम्यान जखमी झालेल्यांना पोलीस आणि ग्रामस्थांनी स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

मुसळधार पावसातून जात असताना स्कॉर्पिओ कार आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. यामध्ये कारमधील 10 प्रवाशांपैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या आणि ट्रकच्या बोनेटचा चुराडा झाला आहे. त्यामुळे कार तोडून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड इथे हा भीषण अपघात झाला.

हे वाचा-कोरोनाच्या संकटात 'हे' राज्य झालं मालामाल, सापडला 120 कोटींचा खजिना

हे वाचा-कोरोनाला उंचीची भीती? समुद्रसपाटीपेक्षा डोंगराळ भागात व्हायरसचा प्रभाव कमी

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 5, 2020, 9:51 AM IST

ताज्या बातम्या